Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीचं शिर घेऊन हजर झालेल्या पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा; 10 वर्षाआधीच्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल

कात्रज भागात दहा वर्षांपुर्वी घडलेल्या पत्नीच्या निर्घुन हत्या आणि तिचे मुंडके हातात घेऊन रस्त्याने पायी जाऊन पोलिस ठाण्यात हजर होणाऱ्या पतीला पुणे सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 08, 2026 | 12:30 AM
बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा

बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील कात्रज भागात दहा वर्षांपुर्वी घडलेल्या पत्नीच्या निर्घुन हत्या आणि तिचे मुंडके हातात घेऊन रस्त्याने पायी जाऊन पोलिस ठाण्यात हजर होणाऱ्या पतीला पुणे सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे मुंडके, हात आणि पाय कुऱ्हाडीने तोडून तिची निर्घृण हत्या केली होती. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील जोशी यांनी हा आदेश दिला आहे.

 

रामचंद्र शेहू चव्हाण (वय ७४, रा. गंगा ओशियन पार्क सोसायटीसमोर, कात्रज) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी सोनाबाई रामचंद्र चव्हाण (वय ५५) यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. २०१५ मध्ये ही घटना घडली होती.

सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी या प्रकरणात एकूण २४ साक्षीदार तपासले. यात आरोपीची सून सुनीता चव्हाण ही मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिने डोळ्यांदेखत आपल्या सासूवर झालेला हल्ला पाहिला होता. याशिवाय, शेजारच्या इमारतीमधील रहिवाशाने आपल्या बाल्कनीतून ही घटना पाहिली होती. तसेच, रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने आरोपी कापलेले मुंडके घेऊन जात असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. विशेष म्हणजे, हा साक्षीदार नोकरीनिमित्त जपानमध्ये असतानाही, न्यायालयाने जपानमधून त्याची साक्ष नोंदवून घेतली. एक ५ वर्षांच्या चिमुरडीही ‘अण्णा’ (आरोपी) ला ओळखले.

आरोपीने न्यायालयात असा बचाव केला होता की, हा गुन्हा दुसऱ्या कोणीतरी केला असून, आपण केवळ भीतीपोटी मुंडके आणि कुऱ्हाड घेऊन पोलिस ठाण्यात जात होतो. न्यायालयाने आरोपीचा बचाव फेटाळून लावत त्याला दोषी ठरवले.

काय आहे प्रकरण?

ही घटना ९ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका मोकळ्या जागेत घडली होती. आरोपी रामचंद्र चव्हाण हा सुरक्षारक्षक (वॉचमन) म्हणून काम करायचा. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्यांच्यात सतत वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी आरोपीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्याने केवळ तिची हत्याच केली नाही, तर तिचे मुंडके, दोन्ही हात आणि दोन्ही पाय शरीरापासून वेगळे केले. नंतर आरोपी पत्नीचे कापलेले मुंडके आणि कुऱ्हाड घेऊन रस्त्यावरून चालत निघाला होता, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा : सुरक्षा व्यवस्था की कार्यकर्त्यांचे पुनर्वसन? नवनियुक्त नगरसेवकांचा आपलीच माणसे भरण्यासाठी प्रशासनावर दबाव

‘बायकोला मारले’ कबुली न्यायालयात सिद्ध

घटनेनंतर आरोपी एका हातात मुंडके (त्यातून रक्त गळत असलेले) व दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेऊन चालला होता. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने आरोपीला विचारले की ‘ अण्णा कुठे बकरू कापले? त्यावेळी आरोपी म्हणाला, ‘ बायकोला मारले’. आरोपीने महिलेला दिलेला कबुलीजबाब सरकारी पक्षाने न्यायालयात सिद्ध केला.

Web Title: The court has sentenced the accused who murdered his wife in katraj area to a heavy sentence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Court
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.