संग्रहित फोटो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा मेमाणे ही शिक्षण घेत असलेली तरुणी असून, ९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. मात्र दिवसभर उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. ओळखीच्या ठिकाणी चौकशी तसेच मित्रमैत्रिणींशी संपर्क साधूनही तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर तिचे वडील दत्तात्रय नामदेव मेमाणे (रा. शारदानगर) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास माळेगाव खुर्द–केव्हिके रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत पाण्यावर तरंगणारा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो प्रतीक्षा मेमाणे हिचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पुढील तपास हवालदार सय्यद करीत आहे.
लोणीकंदमध्ये 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे नाव वैष्णवी यशवंत लाटे (वय २२) असे आहे. या प्रकरणी तिची आई गंगाबाई अशोक जामकर (रा. वडगाव गुंदा, जि. बीड) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार ७ मे २०२५ पासून विवाहितेला सासरी वारंवार पैश्यांसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. पती यशवंत शिवनाथ लाटे हा मारहाण करून शिवीगाळ करत आईकडून पैसे आणण्याची मागणी करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सासू सखुबाई शिवनाथ लाटे, सासरा शिवनाथ महादेव लाटे आणि दिर सुरज शिवनाथ लाटे यांनीही पैश्यांसाठी तगादा लावत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे.






