Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; आठवडाभरात तब्बल 116 आरोपी अटकेत

विषारी दारूमुळे घडलेल्या मृत्यूकांडानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात मोठी मोहीम उघडली असून, गेल्या सात दिवसांत १४२ गुन्हे नोंद करून ११६ आरोपींना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2026 | 12:30 AM
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; आठवडाभरात तब्बल 116 आरोपी अटकेत

विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; आठवडाभरात तब्बल 116 आरोपी अटकेत

Follow Us
Follow Us:

पुणे : विषारी दारूमुळे घडलेल्या मृत्यूकांडानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात मोठी मोहीम उघडली असून, गेल्या सात दिवसांत १४२ गुन्हे नोंद करून ११६ आरोपींना अटक केली आहे. तर तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई २९ मे ते ४ जून या कालावधीत पुणे विभागात केली आहे.

 

गेल्या आठवड्यात विषारी दारू पिल्याने फुगेवाडी, काळेपडळ तसेच हडपसर भागात जवळपास २२ जणांचा मृत्यू झाला. यानंतर या अवैध दारूचा प्रश्न ऐरणीवर आला. यापार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कानडे यांनी विशेष मोहिम उघडून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार, गेल्या सात दिवसांत राबविलेल्या या मोहिमेत ८ हजार ४७२ लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. तर गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ६९ हजार २७१ लिटर रसायन जागीच नष्ट केले. शिवाय ११ हजार ७३३ लिटर परराज्यातील व बनावट मद्य जप्त करण्यात आले. अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ११ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

जनजागृती करण्याच्या सूचना

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी १२५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मेथेनॉलमिश्रित दारू प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंचा तपास सीआयडी करत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविलेल्या तीन गुन्ह्यांचाही तपास सीआयडीच्या समन्वयाने सुरू आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांना विषारी दारूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अवैध दारू व्यवसायाशी संबंधित बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून; लोखंडी पाईप अन् सिमेंटच्या गट्ट्याने वार करुन संपवलं

मेथेनॉल पुरवठादारांची माहिती संकलित

मेथेनॉलच्या अवैध वापराला आळा घालण्यासाठी औषध प्रशासन विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व मेथेनॉल पुरवठादारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. संबंधितांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, संशयास्पद व्यवहारांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अवैध दारू व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या वीजजोडण्या तोडण्याबाबत महावितरणलाही सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: The excise department has taken major action within a week after the poisonous liquor case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त
1

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
2

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…
3

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.