Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सुरू केलेल्या 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत पुणे विभागात चार दिवसांच्या विशेष तपासणी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 17, 2026 | 12:14 PM
पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित

Follow Us
Follow Us:

पुणे :  अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात चार दिवसांच्या विशेष तपासणी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. ११ ते १४ ऑगस्टदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स वितरण केंद्रे आणि डेअरी आस्थापनांची तपासणी करण्यात आली. स्वच्छतेचे निकष न पाळणे, अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन आणि आवश्यक परवाना नसल्याचे आढळल्याने १६ आस्थापनांचे परवाने व नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

सहआयुक्त (अन्न) डी. वा. भोगावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील हॉटेल सयाजी (लोणावळा), हॉटेल चुल मटण (लोहेगाव), सिम्पली साऊथ (भोसरी) आणि जेबीएम हॉस्पिटॅलिटी कॅन्टीन (वानवडी) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच परवान्याविना व्यवसाय सुरू असल्याने कॅम्पमधील बर्गर किंग शाखेला तातडीने व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय कराड, कोल्हापूर व सांगली येथील हॉटेल, डॉमिनोज आणि पिझ्झा हटच्या शाखांचाही कारवाईत समावेश आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रातील झेप्टो (लोहेगाव), ब्लिंक कॉमर्स (नऱ्हे व भवानी पेठ) आणि स्विन्स्टा ईएनटी प्रा. लि. (वारजे) या वितरण केंद्रांवरही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डेअरी विभागात ओम साईराम मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स (खेड), धर्मनाथ दूध शीतकरण केंद्र (आंबेगाव) आणि आर. के. मिल्क (सातारा) यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम सुरू असून, स्वच्छतेच्या निकषांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अन्नाच्या दर्जा, स्वच्छता किंवा भेसळीबाबत तक्रार असल्यास १८००-२२-२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला ‘अलर्ट’; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

सोमवारपासून शाळांजवळ जंक फूडविरोधी मोहीम

अन्न व औषध प्रशासन सोमवारपासून शाळांच्या ५० मीटर परिसरात उच्च चरबी, साखर व मीठ असलेल्या पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांविरोधात विशेष मोहीम राबविणार आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात जंक फूडची विक्री आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Web Title: The food and drug administration has carried out a major operation in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
1

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
2

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
3

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
4

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.