Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस कोठडीतील मृत्यूंना आळा बसणार; गृह विभागाकडून नवी नियमावली जाहीर

पोलीस कोठडीतील मृत्यू (कस्टोडिअल डेथ) प्रकरणांना आळा घालण्यासाठी आणि तपास प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने मंगळवारी (२८ जुलै) सर्वसमावेशक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 30, 2026 | 02:03 PM
पोलीस कोठडीतील मृत्यूंना आळा बसणार; गृह विभागाकडून नवी नियमावली जाहीर

पोलीस कोठडीतील मृत्यूंना आळा बसणार; गृह विभागाकडून नवी नियमावली जाहीर

Follow Us
Follow Us:

नांदेड : पोलीस कोठडीतील मृत्यू (कस्टोडिअल डेथ) प्रकरणांना आळा घालण्यासाठी आणि तपास प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने मंगळवारी (२८ जुलै) सर्वसमावेशक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोग तसेच भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम यांच्या तरतुदींचा समावेश करून हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

 

नव्या नियमावलीनुसार, बृहन्मुंबईतील कोठडीतील मृत्यू प्रकरणांचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे, तर उर्वरित राज्यातील प्रकरणांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविणे बंधनकारक राहणार आहे. घटना घडल्यानंतर २४ तासांच्या आत राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाला माहिती देणे आवश्यक असून कार्यकारी दंडाधिकाऱ्यांमार्फत मरणान्वेषण पंचनामा केला जाईल. अटक करण्यापूर्वी आरोपीची सविस्तर वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली असून, पोलीस कोठडीतील रिमांडदरम्यान दर ४८ तासांनी वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे. लॉकअप, चौकशी कक्ष आणि प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाईट व्हिजन व ऑडिओ सुविधायुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले असून त्यांचे फुटेज किमान १८ महिने जतन करावे लागणार आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन किमान तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून करून त्याचे संपूर्ण ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग ठेवणेही सक्तीचे करण्यात आले आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास वारसांना १ लाख, तर दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यास १.५ लाखांची आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांकडून मारहाण झालेल्या आरोपींना थेट पोलीस कोठडीत न ठेवता प्रथम रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमावलीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर पर्यवेक्षण समित्या (एसएलओसी व डीएलओसी) कार्यरत राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा : सिल्लोडमध्ये अज्ञात व्यक्तीचा गळा चिरून निघृण खून; घटनास्थळावरून रक्ताने माखलेला कटर जप्त

सिल्लोडमध्ये अज्ञात व्यक्तीचा गळा चिरून निघृण खून

सिल्लोडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिल्लोड शहरात बुधवारी (२९ जुलै) अज्ञात व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी आहे. त्याचा मृतदेह सिल्लोड-भोकरदन मार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या संरक्षक भिंतीलगत आढळून आला.

Web Title: The home department has issued new guidelines to prevent deaths in police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
1

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
2

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र
3

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
4

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.