Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! गणपती बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; चाकण परिसरात चार तरुण पाण्यात बुडले

हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी येथील पाणवठ्यांमध्ये गणेश विसर्जन करताना चार तरुण पाण्यात बुडाले. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध अद्याप सुरू आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2025 | 05:15 PM
धक्कादायक! गणपती बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; चाकण परिसरात चार तरुण पाण्यात बुडले

धक्कादायक! गणपती बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; चाकण परिसरात चार तरुण पाण्यात बुडले

Follow Us
Follow Us:

चाकण : गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि भक्तिभावात विसर्जन मिरवणुका सुरू असताना चाकण परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी (ता. खेड) येथील पाणवठ्यांमध्ये गणेश विसर्जन करताना चार तरुण पाण्यात बुडाले. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाकी बुद्रुक – भामा नदीत दोन युवक बुडाले

वाकी बुद्रुक येथील प्रियदर्शन शाळेजवळील भामा नदीत अभिषेक संजय भाकरे (२१, रा. कोयाळी, ता. खेड) व आनंद जयस्वाल (२८, रा. उत्तरप्रदेश) हे दोघे विसर्जनासाठी उतरले होते. यावेळी पाण्याच्या खोलवर गेल्याने ते बुडाले. यामध्ये आनंद जयस्वाल याचा मृतदेह सापडला, तर अभिषेक भाकरे याचा शोध अजूनही सुरू आहे. शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे रवींद्र वासुदेव चौधरी (४५) हे नदीत विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा मृतदेह शोध पथकांना सापडला असून, त्याला चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिरदवडी – विहिरीत पडून मृत्यू

बिरदवडी (ता. खेड) येथील संदेश पोपट निकम (३५) हे गणेश विसर्जनासाठी गेले असता त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले व बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दल व रेस्क्यू टीमच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

बचावकार्य, रेस्क्यू टीमची मदत

या सर्व घटनास्थळी तात्काळ चाकण पोलीस, एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दल तसेच स्थानिक रेस्क्यू टीम दाखल झाली. पाण्यातील शोधमोहीमेसाठी नदीकाठ व विहिरीभोवती पथके तैनात आहेत. त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बेपत्ता युवकाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

पोलिसांचे आवाहन धाब्यावर बसले

गणेश विसर्जनादरम्यान “नदीत, विहिरीत किंवा खोल पाण्यात न उतरता कृत्रिम तलावांचा वापर करावा” असे आवाहन चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून वारंवार करण्यात आले होते. तरीही काही भक्तांकडून हे आवाहन दुर्लक्षित करून थेट नदीपात्रात प्रवेश केला गेला. निष्काळजीपणामुळे तीन जणांचे प्राण गेले असून, एक अजूनही बेपत्ता आहे.

Web Title: The incident of four youths drowning in the chakan area has created a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis
  • Death
  • Ganesh Utsav 2025

संबंधित बातम्या

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
1

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

भीषण अन् महाभयंकर! परत जातो म्हणून निघाला अन्…; नाणेघाटात ‘त्या’ युवकासोबत घडले तरी काय?
2

भीषण अन् महाभयंकर! परत जातो म्हणून निघाला अन्…; नाणेघाटात ‘त्या’ युवकासोबत घडले तरी काय?

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…
4

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.