Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात ‘दुधानी टोळी’ जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत जबरी चोरी, लूटमार, घरफोडी आणि सशस्त्र दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात 'दुधानी टोळी'चा (शिकलकरी गँग) ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2026 | 12:30 AM
ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात 'दुधानी टोळी' जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले

ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात 'दुधानी टोळी' जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले

Follow Us
Follow Us:

ओतूर : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत जबरी चोरी, लूटमार, घरफोडी आणि सशस्त्र दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात ‘दुधानी टोळी’चा (शिकलकरी गँग) ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रविवारी (१२ जुलै) जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथे स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या अफाट धाडसामुळे या आंतरराज्यीय टोळीतील ६ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्टल (गावठी कट्टा), कटावणी, कटर, पान्हे आणि चोरीची बोलेरो गाडी यांसह गुन्ह्यासाठी लागणारे विविध घातक साहित्य जप्त केले आहे.

 

या टोळीवर एकट्या तेलंगणा राज्यात तब्बल २५ गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांमध्ये सोनुसिंग पापसिंग दुधानी (वय ३५, रा. हडपसर, पुणे), जिलूसिंग शेरसिंग दुधानी (वय ३८, रा. खोपोली, जि. रायगड), पंकजसिंग धारूसिंग शिकलकर (वय ४०, रा. आंबरनाथ), करणसिंग गगणसिंग टाक (वय २७, रा. जि. परभणी), मंगलसिंग मायासिंग दुधाने (वय ६०, रा. झरी, जि. परभणी), कृष्णासिंग साहेबसिंग टाक (वय १८, रा. झरी, जि. परभणी) या गुंडाचा समावेश आहे.

चोरीच्या गाडीमुळे फुटले बंड; असा घडला थरार

राहुरी (जि. अहमदनगर) येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीची महिंद्रा बोलेरो गाडी (क्रमांक: एमएच-१७ एजे-३०७५) काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथील विघ्नेश घोलप हे नगर-कल्याण महामार्गावरून जात असताना, त्यांना येथील एका वडापाव हॉटेलसमोर आपल्या नातेवाईकांची चोरी झालेली बोलेरो गाडी उभी असलेली दिसली. संशय बळावल्याने घोलप यांनी दाखवलेल्या हुशारीमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनी थेट गाडीची चावी काढून घेतली आणि गाडीतील व्यक्तींकडे चौकशी सुरू केली. यावर गांगरलेल्या आरोपींनी घोलप यांच्याशी झटापट करत स्थानिक नागरिकांवर दगडफेक सुरू केली. तसेच जवळ असलेल्या हत्यारांचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

ग्रामस्थांनी शेतात पाठलाग करून आरोपींना पकडले

आरोपी पळत असताना ग्रामस्थांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांचा थरारक पाठलाग केला. सुरुवातीला ४ जणांना नागरिकांनी जागीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर उर्वरित २ आरोपींनी कट्ट्याचा धाक दाखवून आलमे गावच्या दिशेने पळ काढला. मात्र, घटना कळताच परिसरातील शेकडो ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी शेतातून आणि झाडीझुडपातून थरारक पाठलाग करून पळून गेलेल्या इतर आरोपींनाही हुडकून काढले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले सर्व आरोपी अत्यंत सराईत आणि हिंसक प्रवृत्तीचे आहेत. कोळवाडीच्या ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे आणि धाडसामुळे या टोळीला पकडता आले असून, परिसरात होणारा एक मोठा अनर्थ टळला आहे.

हे सुद्धा वाचा : ‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा दरोडा, तब्बल 3500 कोटी…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

पोलीस पथकाची धडक कारवाई

या मोठ्या कारवाईची माहिती मिळताच जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, योगेश उकर्डे, ज्योतीराम पवार, मनोज राठोड, दिनेश साबळे, सुभाष केदारी, रोहित बोबले आणि विशाल गोडसे यांच्या पथकाने पुढील कायदेशीर कारवाई व शोधमोहीम यशस्वीरीत्या केली. या टोळीकडून महाराष्ट्रातील अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, कोळवाडी ग्रामस्थांच्या या धाडसी कामगिरीचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

Web Title: The otur police have arrested six members of the dudhani gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…
1

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
2

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
4

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.