Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगार आणि समाजकंटकांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2026 | 03:32 PM
गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

Follow Us
Follow Us:

पिंपरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगार आणि समाजकंटकांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २ हजार ५७३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यातील ५८ सराईत गुन्हेगारांना तडीपार, तर दोन जणांवर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेत दहशत निर्माण करणे, हुल्लडबाजी करणे किंवा गुन्हेगारी कारवायांना खतपाणी घालणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.

परिमंडळ चारमध्ये सर्वाधिक कारवाई

पोलिसांच्या चारही परिमंडळांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. परिमंडळ एकमध्ये ३६२, परिमंडळ दोनमध्ये २४७, परिमंडळ तीनमध्ये ५७२, तर परिमंडळ चारमध्ये तब्बल १ हजार ३९२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कारवाईमध्ये परिमंडळ चारचा वाटा सर्वाधिक राहिला.

५८ गुन्हेगार शहराबाहेर

उत्सवाच्या काळात शांततेला बाधा पोहोचविण्याची शक्यता असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६ अंतर्गत ५०, तर कलम ५५ अंतर्गत आठ जणांना तडीपार करण्यात आले. त्यामुळे ५८ गुन्हेगारांना गणेशोत्सव काळात शहराबाहेर राहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा : प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा होणार अधिक सक्षम; तब्बल 5 हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

बंधपत्राच्या कारवाईतून गुन्हेगारीला ‘वेसण’

केवळ तडीपारी किंवा ‘एमपीडीए’पुरती कारवाई मर्यादित न ठेवता पोलिसांनी संभाव्य उपद्रवी व्यक्तींवर बंधपत्राची कारवाईही केली. बीएनएसएस कलम १२६ अंतर्गत ४१४ जणांकडून शांतता राखण्याचे बंधपत्र घेण्यात आले. कलम १२८ अंतर्गत ३२, तर कलम १२९ अंतर्गत २२० जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय बीएनएस कलम १६८ अंतर्गत १ हजार ८०० जणांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या. बेकायदा दारूविक्री करणाऱ्या ३५ जणांवर दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

गणेशोत्सव आनंदात साजरा करा; मात्र कायदा हातात घेऊ नका. दहशत, हुल्लडबाजी आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर अफवा किंवा भडकावू संदेश प्रसारित करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. — विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

Web Title: The pimpri chinchwad police are taking strict action against criminals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • crime news
  • Pimpri Chinchwad
  • Police News

संबंधित बातम्या

जमिनीच्या वादातून भावानेच केला भावाचा खून; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

जमिनीच्या वादातून भावानेच केला भावाचा खून; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

धक्कादायक ! सासऱ्याने केली सुनेची हत्या; कुऱ्हाडीने डोक्यावर केले सपासप वार
2

धक्कादायक ! सासऱ्याने केली सुनेची हत्या; कुऱ्हाडीने डोक्यावर केले सपासप वार

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई
3

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई

Nagpur Crime : सूनेवर जादुटोणाचा संशय! सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करून केली हत्या; नंतर स्वतःही विहिरीत मारली उडी
4

Nagpur Crime : सूनेवर जादुटोणाचा संशय! सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करून केली हत्या; नंतर स्वतःही विहिरीत मारली उडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.