Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडलेल्या सलग दोन गोळीबाराच्या घटनांचे प्रकरण चांगलेच भोवले असून, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत दोन पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 27, 2026 | 11:57 AM
गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:

पुणे : खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडलेल्या सलग दोन गोळीबाराच्या घटनांचे प्रकरण चांगलेच भोवले असून, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत दोन पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. सोबतच गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील अधिकारी, कर्मचारी यांनाही कंट्रोलला सलग्न करण्यात आले आहे. या कारवाईनंतर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्वारगेट पोलिस ठाण्यातील खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गोळीबारातील दोन आरोपी वॉन्टेड असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे स्वारगेट पोलिस ठाण्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची नियंत्रण कक्षात बदली केली. तर, त्यांच्या जागी वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक धनंजय पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, खडक परिसराची हद्द असलेल्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक अजित जाधव यांचीही नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाची नेमणूक करण्यात आलेली नाही. यासोबतच इतर काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत.

जुन्या वादातून शुक्रवारी घोरपडे पेठ पोलिस चौकीसमोरच भरदिवसा गोळीबार झाला. एका तरुणावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी तरुणाला लागली. हे प्रकरण सुरू असतानाच अवघ्या काही तासांत लोहियानगर परिसरात अल्पवयीन मुलांनी एका ठिकाणी हवेत गोळीबार केला. तर, काही अंतरावर एका मुलावर देखील गोळीबार केला. सलग घडलेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे मध्यवर्ती भागातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने प्रशासकीय फेरबदल करत खडक पोलिस ठाण्याच्या नेतृत्वात बदल केला आहे. दरम्यान, यासह इतर काही पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. गोळीबाराचे प्रकरणात गुन्हे शाखेला देखील धाऱ्यावर धरण्यात आले असून, गेल्या काही दिवसांमधील गुन्हे शाखेचे नेमके कामकाज काय असा मुद्दा यानिमित्ताने समोर आला आहे.

हे सुद्धा वाचा : 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर आत्महत्या, गर्भाच्या DNA ने उघड केला नराधमाचा चेहरा आणि…

येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान यांची गुन्हे शाखेत तर, येरावड्याचे गुन्हे निरीक्षक निळकंठ जगताप यांची लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. तर लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक उमेश गित्ते यांची येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: The police commissioner has taken a major decision following the shooting incident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Badminton चा थरार! पीवायसी कोर्टवर रंगल्या अटीतटीच्या लढती; वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी
1

Badminton चा थरार! पीवायसी कोर्टवर रंगल्या अटीतटीच्या लढती; वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका
2

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास
3

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास

अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ
4

अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.