Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिस्तूल विक्रीचा डाव उधळला, गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चौघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दिनांक ७ रोजी दुपारी सापळा रचून पकडले आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 09, 2026 | 12:28 PM
पिस्तूल विक्रीचा डाव उधळला, गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चौघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल विक्रीचा डाव उधळला, गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चौघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दिनांक ७ रोजी दुपारी सापळा रचून पकडले आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. चौकशीत पिस्तूल विक्रीसाठी देणाऱ्या दोघांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे. चौघांकडून पिस्तूल, काडतुसे, दुचाकी आणि मोबाइल असा १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई जटवाडा रोडवरील आनंद क्लिनिकजवळ करण्यात आली आहे. शेख शकील शेख नाजीम (वय १९, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड), सय्यद अल्फाज सय्यद अहमद (वय २१, रा. न्यू आलमगीर कॉलनी, जटवाडा रोड), शेख अबु नासेर शेख रशिद (वय २७, रा. आनंद मेडिकलची गल्ली, सईदा कॉलनी), उमर दुर्राणी जिया दुर्राणी (वय २५, रा. गल्ली नं. १, पिली कॉलनी, चंपाचौक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जटवाडा रोडवर यांनी केली कारवाई

या प्रकरणात गुन्हे शाखेचे हवालदार योगेश चंद्रशेखर गुप्ता (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी शहरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिस उपनिरीक्षक अर्जुन कदम यांना जटवाडा रोडवर दोन तरुण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ते पथकासह त्यांनी जटवाडा रोड गाठला. दुपारी २.४० वाजता संशयीत दोन तरुण दुचाकीवर दिसताच पोलिसांनी त्यांना घेरले. त्यांची झडती घेतली असता शेख शकील याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. त्याच्यासोबत असलेल्या सय्यद अल्फाज याच्याकडून दुचाकी आणि मोबाइल जप्त करण्यात आला. पिस्तूल कुणी दिले, याबाबत चौकशी केली असता शकील याने शेख अबु नासेर आणि उमर दुर्राणी यांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई उपनिरीक्षक अर्जुन कदम, हवालदार साळुंके, काळे, गिते आणि अंमलदार खंडागळे यांच्या पथकाने केली.

गॅलरीत पिस्तूलचे फोटो

दोघांच्या मोबाइलची तपासणी केली असता फोटो गॅलरीमध्ये पिस्तूलचे फोटो आढळून आले. तसेच त्यांच्या मोबाइलमधून इतर आरोपींशी फोनवरून संपर्क असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. अबु नासेर आणि उमर यांच्याकडून प्रत्येकी एक मोबाइल जप्त करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : व्हायरल ऑडिओ क्लिपचं प्रकरण भोवलं, विजय चाैधरींंना अटक; ‘या’ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

१ लाख ८२ हजारांचा ऐवज हस्तगत

या कारवाईत चौघा आरोपींकडून पिस्तूल व दोन काडतुसांसह दुचाकी आणि चार मोबाइल असा १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मारोती मदेवाड करीत आहेत.

Web Title: The police have arrested four people for selling pistols

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.