Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

जुन्नर येथील व्यावसायिकाच्या भांड्याच्या गोडाऊनमधून नव्वद तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2026 | 03:48 PM
तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरात सापळा रचून पकडले

तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरात सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

जुन्नर : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये आणि व्यवसायिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी चोरीची घटना समोर आली आहे. जुन्नर येथील व्यावसायिकाच्या भांड्याच्या गोडाऊनमधून नव्वद तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांनी चोरलेल्या ९० हांड्यापैकी सुमारे एक लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे ५५ हांडे त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहेत. चोरीची ही घटना २० मार्च रोजी रात्रीच्या वेळी घडली होती.

 

याबाबत जुन्नर पोलीस स्टेशनला व्यावसायिक आनंद हेमंत सासवडे यांनी फिर्याद दिली होती. महाजन आळी-जुन्नर येथील त्यांच्या भांड्याच्या गोडाऊनमधून तीन महिलांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत होते. ह्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता भांड्याच्या गोडाऊनमधून काही अज्ञात महिला हांडे चोरून नेत असताना दिसून आले. यावरून सदरचा गुन्हा अज्ञात महिलांनी केल्याचे निष्पन्न झाले.

दिपक साबळे व पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार याचा गुन्हा सारिका बबन मकवाने, अंजली सुरज वाघमारे, सुरेखा राजू वालेकर (सर्व रा. पंचलिंग झोपडपट्टी वस्ती जुन्नर) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कुरण फाटा, जुन्नर येथे सापळा लावून सदर महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. संदीप गिल्ल, रमेश चोपडे, धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षीरसागर, किरण अवचर, महादेव शेलार, दिपक साबळे, राजू मोमीन,संदीप वारे,अक्षय नवले, निलेश सुपेकर, नंदा कदम, सुजाता कदम, सागर हिले यांनी ही कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा : हमीपत्र दिलेल्या विकसकांवर पाणीपुरवठ्याची जबाबदारी, दुर्लक्ष केल्यास…; आयुक्तांचा इशारा

पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून रोकड चोरली

कल्याणीनगर परिसरात पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी ३० हजारांची रोकड तसेच कागदपत्रे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोद केला आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी भरदुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कल्याणीनगर भागात राहण्यास आहेत. त्यांनी त्यांची कार लेन नंबर ६ मध्ये पार्क केलेली होती. कारच्या डिक्कीत दोन लेदरच्या बॅग व त्यात ३० हजारांची रोकड होती. तर काही कागदपत्रेही होती. अज्ञात चोरट्यांनी डिक्की कशाच्या तरी सहाय्याने उघडून त्यातून या वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक फंटागरे हे करत आहेत.

Web Title: The police have arrested the women who were stealing copper vessels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
1

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
2

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
3

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.