Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

परदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने खडकी रेल्वे स्थानक परिसरात पकडले आहे. या प्रकरणात सराइताच्या साथीदारालाही अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2026 | 02:45 PM
पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल...

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल...

Follow Us
Follow Us:

पुणे : परदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने खडकी रेल्वे स्थानक परिसरात पकडले आहे. या प्रकरणात सराइताच्या साथीदारालाही अटक केली आहे. त्यांच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल, सहा काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी वीर श्याम दलगज (वय २२, रा. पारसी चाळ, देहूरोड), सार्थक शिवनागी वाघलगवे (वय २२, रा. पिंपरी) यांना अटक केली आहे.

पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद खोपीकर, उपनिरीक्षक शंभू रणवरे, यशवंत साळुंखे, अमरदीप साळुंखे, इम्तियाज आवटी, धीरज कपिले, प्रशांत डोईफोडे, अमोल शेळके, सागर शेंडकर, गणेश बच्छाव यांनी ही कामगिरी केली आहे. दलगजविरुद्ध देहूरोड पोलिसांत गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

११ ऑगस्ट रोजी लोहमार्ग पोलिसांचे पथक खडकी रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी दलगज हा फलाट क्रमांक एक परिसरात थांबला होता. अंधारात थांबलेल्या दलगज याला पोलिसांना पाहिले. पोलिसांना पाहताच तो पसार झाला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे परदेशी बनावटीचे पिस्तूल, तसेच सहा काडतुसे सापडली. पिस्तुलाबाबत पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा साथीदार वाघलगवे याने पिस्तूल दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाघलगवे याला ताब्यात घेतले. परदेशी बनावटीचे पिस्तूल कुठून आणले, तसेच त्यांना कोणी दिले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : नोकरीत भागेना, बहाद्दराने काढला ड्रग्जचा कारखाना; पोलिसांना सुगावा लागला अन्…

सहकारनगर परिसरातही गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला

पुणे शहरातील गुन्हेगारी पिस्तूलांच्या आधारावर दहशत माजवित असल्याचे दिसत असून, हा आधार मिळवत गुन्हेगार धुडगूस घालत असताना सहकारनगर परिसरातही गुन्हे शाखेने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गुन्हेगारांना पिस्तूल घेऊन फिरताना पकडल्याने मोठा गुन्हा देखील टळल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई युनिट दोनच्या पथकाने केली आहे. सुफियान बशीर शेख (वय २२), निलेश प्रभुलिंग कुंभार (वय २१), तुकाराम बाबासाहेब गवते (वय १९), ऋषभ ऊर्फ ऋषी शिवाजी भगत (वय २३) आणि अमित राजाराम पिलावरे (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अंगझडतीत चार पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली.

Web Title: The police have arrested two individuals for possessing a pistol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
1

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
2

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नोकरीत भागेना, बहाद्दराने काढला ड्रग्जचा कारखाना; पोलिसांना सुगावा लागला अन्…
3

नोकरीत भागेना, बहाद्दराने काढला ड्रग्जचा कारखाना; पोलिसांना सुगावा लागला अन्…

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल
4

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.