Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीत भागेना, बहाद्दराने काढला ड्रग्जचा कारखाना; पोलिसांना सुगावा लागला अन्…

राजस्थानातील २८ वर्षीय महावीरने नोकरी सोडून एक असा व्यवसाय सुरू केला, ज्यातून लाखो रुपयांचा नफा मिळवले. पण एके दिवशी त्याचे बिंग फुटले आणि एमडीएमए ड्रग्ज निर्मितीचा घरातच सुरू केलेला कारखाना उघडकीस आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2026 | 11:40 AM
नोकरीत भागेना, बहाद्दराने काढला ड्रग्जचा कारखाना; पोलिसांना सुगावा लागला अन्...

नोकरीत भागेना, बहाद्दराने काढला ड्रग्जचा कारखाना; पोलिसांना सुगावा लागला अन्...

Follow Us
Follow Us:

जयपूर : तो नोकरी करत होता. पण, त्यातून मिळणारा पैसा त्याला पुरत नव्हता. नोकरीत सडत राहिलो तर आयुष्य वाया जाईल. काहीतरी मोठे करायला हवे. रातोरात करोडपती व्हायला हवे, या विचारातून राजस्थानातील २८ वर्षीय महावीरने नोकरी सोडून एक असा व्यवसाय सुरू केला, ज्यातून लाखो रुपयांचा नफा मिळवले. पण एके दिवशी त्याचे बिंग फुटले आणि एमडीएमए ड्रग्ज निर्मितीचा घरातच सुरू केलेला कारखाना उघडकीस आला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल १०० कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महावीर हा २८ लक्ष्मणपुरा कुचेरा येथील रहिवासी आहे. तो सध्या नागौरमधील दीप कॉलनीत राहतो. तो पूर्वी नोकरी करत होता, पण त्याच्या कमाईवर तो असमाधानी होता. अधिक पैशांच्या लोभापायी त्याने नोकरी सोडली. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान त्याने एमडीएमए बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचे पहिले प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर त्याने एमडीएमए उत्पादनाबद्दलची माहिती ऑनलाइन गोळा केली. हळूहळू, त्याने पद्धत शिकून घेतली आणि एक सेटअप तयार करण्यास सुरुवात केली. फेब्रुवारी २०२६ मध्ये नोकरी सोडल्यानंतर, त्याने नागौरमधील एक घर भाड्याने घेतले आणि तिथेच ड्रग्ज उत्पादनाचा कारखाना सुरू केला. ते घर बाहेरून सामान्य दिसत होते, पण आतमध्ये ड्रग्जची फॅक्टरी सुरू होती.

…आणि पोलिसांना लागला फॅक्टरीचा सुगावा

महावीरच्या ह्या ‘उद्योगा’ला ग्रहण लागले १० ऑगस्ट २०२६ रोजी. पोलिसांना महावीरच्या या कारनाम्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नागौरच्या दीप कॉलनीत कारवाई केली. तेथे महावीरला एमडीएमए बनवण्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली. पोलिसांनी त्या कारवाईत २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य जप्त केल्याचा दावा केला. तथापि, चौकशीनंतर हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले. पोलिसांनी महावीरची चौकशी केली. याच दरम्यान, जोधपूर रोडवरील एका घराविषयी माहिती मिळाली. पोलिसांच्या मते, या जागेचा वापरही एमडीएमए बनवण्यासाठी केला जात होता. त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. या दुसऱ्या कारवाईत जे काही उघड झाले, त्याने संपूर्ण प्रकरणाचे स्वरूपच बदलून टाकले.

एक फोन, अनेक सिमकार्ड, बदलती ओळख

तपासादरम्यान आणखी एक गोष्ट उघडकीस आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महावीरकडे अंदाजे १० ते १२ मोबाईल सिमकार्ड होते. तो कधीही एकच सिमकार्ड जास्त काळ वापरत नसे आणि दर १० दिवसांनी ते बदलत असे. पोलिस आता मोबाईलमधील संपर्क आणि इतर पुराव्यांचा तपास करत आहेत. तो कोणाशी संवाद साधत होता? ती रसायने कुठून आली? त्याला एमडीएमए बनवण्याबद्दलची माहिती कुठून मिळाली? आणि सर्वात मोठा प्रश्नः तयार झालेला पदार्थ कुठे गेला? पोलिस या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. त्याच्या चार साथीदारांची भूमिकाही उघडकीस आली आहे. त्यांची चौकशी करून या नेटवर्कमधील दुवे जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

पोलिसांच्या छाप्यात काय काय सापडले ?

एमडीएमए ड्रग्ज ५.४१८ किलो.

कॅफीन – २.७४४ किलो.

२४ प्रकारची वेगवेगळी रसायने- २१० लिटर.

साहित्याचे अंदाजे बाजारमूल्य – १०० कोटी आहे.

Web Title: The police have busted a drug factory in rajasthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Arrested News
  • Drugs Case
  • Drugs News

संबंधित बातम्या

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
1

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
3

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
4

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.