संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : माहेरून पाच लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहीतेला पैसे आण तरच नांदायला ये, असे म्हणत घरातून हाकलून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ जानेवारी ते ९ जून २०२६ दरम्यान बीड बायपास परिसरातील शहानगरात घडली आहे. याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ जानेवारी २०२६ रोजी पीडितेचे शेख साद याच्याशी लग्न झाले. लग्नानंतर ती पती, सासू निलोफर, सासरा इम्रान शेख व नणंद शेख मसीरा यांच्यासोबत शहानगर परिसरात राहत होती. सासरी आल्यानंतर काही दिवसांनी घरातील किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिला शिवीगाळ व मानसिक त्रास देणे सुरू केले.
तिला घरातील कामे करण्यास सांगून घरात सर्वांचा आदर करायचा, तुझा एटीट्यूड चालणार नाही, असे म्हणत मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. तसेच सासूने माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, तरच नांदायला ये, असे सांगितले. पुन्हा नांदायला आलीस तर हातपाय तोडून टाकू, अशी धमकीही दिल्याचेही फिर्यादीत नमुद आहे. याबाबत तिने आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर ते सासरी आले. नातेवाइकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपये आणा, अन्यथा मुलीला कायमचे घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर ९ जून रोजी विवाहितेला घराबाहेर काढून तिचे स्त्रीधन काढून घेतल्याचे देखील फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सज्जनवार करित आहेत.
हे सुद्धा वाचा : पतीचे पत्नी अन् मुलीवर चाकूने वार, वाकडमधील धक्कादायक प्रकार; धक्कादायक कारणही समोर
दुचाकीवरून जाताना अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर शेजारी राहणाऱ्या चौघांनी एका महिलेसह तिच्या पती व आईला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी एका व्यक्तीने चाकूने महिलेच्या कपाळावर वार करुन तिला जखमी केले आहेत. ही घटना नारळीबाग परिसरात घडली आहे. सचिन उर्फ माया प्रदिप सोनवणे, दिक्षा अमोल भावसार, सोहम सोनवणे (सर्व रा. नारळीबाग) आणि सुवर्णा उर्फ गुड्डी पोटपिल्लेवार (रा. पावन चौक, नारळीबाग) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. त्यांच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

