Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुन्हेगारांची काढली ‘धिंड’ अन् पोलिसांची झाली अडचण! नेमकं प्रकरण काय?

बदलत्या गुन्हेगारीने पुण्याची लक्तरे वेशीला टांगली जात असल्याने पोलिसांनी अशा गुन्हेगारांचा मस्तावलेपणा मोडीत काढण्यासाठी 'धिंड'चा नवा डाव सुरू केला खरा, पण तो आता पोलिसांच्या अडचणीचा ठरू लागला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 06, 2026 | 02:12 PM
गुन्हेगारांची काढली 'धिंड' अन् पोलिसांची झाली अडचण! नेमकं प्रकरण काय?

गुन्हेगारांची काढली 'धिंड' अन् पोलिसांची झाली अडचण! नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे : बदलत्या गुन्हेगारीने पुण्याची लक्तरे वेशीला टांगली जात असल्याने पोलिसांनी अशा गुन्हेगारांचा मस्तावलेपणा मोडीत काढण्यासाठी ‘धिंड’चा नवा डाव सुरू केला खरा, पण तो आता पोलिसांच्या अडचणीचा ठरू लागला आहे. पुण्यातील दोन प्रकरणे पुणे पोलिसांच्या अंगाशी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन व्हायरल व्हिडीओची राज्य मानवी हक्क आयोगाने सु-मोटो दखल घेत चौकशी सुरू केली आहे. मात्र, यामुळे पोलिसांचे मनोधैर्य डाऊन होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पुणेकरांकडून देखील या आयोगाच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत.

पुण्याच्या गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. नवख्या गुन्हेगारांसोबतच अल्पवयीन मुलांकडून दहशतीसाठी नवीन पर्याय निवडले जात आहे. वाहनांची तोडफोड, पिस्तूलांमधून गोळीबार करण्यासोबतच किरकोळ कारणांवरून एखाद्याला बेदम मारहाण करणे यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत. अल्पवयीन मुलांचा त्रासही गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असतानाच अशा रायझिंग गँगकडून दहशतीचे प्रयत्न होत आहे. त्यातून पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

रायझिंग स्टारसोबतच गुन्हेगारांची मस्ती जिरवण्यासाठी पोलिसांकडून ऑफ रेकॉर्ड अशांची त्याच भागातून ‘धिंड’ काढून ती दहशत मोडीत काढण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. एखाद्या घटनेनंतर पोलिस घटनास्थळाच्या परिसरात अशा गुन्हेगारांना फिरवतात. सर्व सामान्य नागरिकांकडून याचे स्वागत  होते. मात्र, काहींकडून त्याला विरोध देखील केला जात आहे.

पोलिसांकडून हे प्रकार सरास सुरू होते. मात्र, पोलिसांना ‘धिंड’ची स्टाईल अडचणी ठरण्याची शक्यता आहे. नुकतेच पुणे पोलिसांचे दोन व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. एका प्रकरणात पुण्यातील दोघांनी मानवी हक्क आयोगाकडे यासंदंर्भात तक्रार दाखल केली. त्यात पुणे पोलिसांना नोटीस बजावण्यात आली आहे. आता या व्हिडीओसोबतच अल्पवयीन मुलांचा पोलिस गाडीवरील व्हिडीओची देखील राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतली आहे. त्यानूसार दोन्ही व्हिडीओ संदंर्भाने ‘फॅक्ट-फाइंडिंग’ सुरू केले असून, त्याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित पोलिस अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

राज्य मानवी हक्क आयोगाने तीन सदस्य समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये जिल्हा न्यायाधीश दर्जाचे रजिस्टार तसेच एक पोलिस अधीक्षकासह तिघांचा समावेश आहे. या समितीने बुधवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भेट देऊन चौकशी केली. संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले. तसेच सीसीटीव्ही फुटेज, पोलिस ठाण्यातील नोंदी, तपासाची कागदपत्रे आणि इतर पुराव्यांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानूसार, एक सविस्तर अहवाल येत्या आठवड्यात आयोगाला सादर केला जाणार आहे.

पुणेकरांच्या मनात दहशत ?

पुण्यात गेल्या काही वर्षात नव्याने उदयास आलेल्या टोळक्यांकडून अचानकच मध्यरात्री वाहनांची तोडफोड तसेच हातात कोयते घेऊन मोठ-मोठ्याने आरडाओरडा करत दहशत माजविण्याचे प्रकार घडू लागले. त्यामुळे पोलिसांनाच धारेवर धरले जाऊ लागले. पोलिसांनी अशा टोळक्यांची मस्ती उतरविण्यासाठी म्हणून ‘धिंड’ हा पर्याय काढला. त्यातून काही प्रमाणात फरक पडला देखील आणि नागरिकांमध्ये अशीच शिक्षा हवी, अशी भावना देखील निर्माण झाली. मात्र, आता हे पोलिसांच्या अंगलट येऊ लागले आहे.

काय आहे प्रकरण?

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाच्या खूनाची घटना घडली होती. नंतर यामधील पकडलेल्या ३ अल्पवयीन मुलांना पोलिस गाडीवर बसवून त्यांना बांधून आणत असताना एका महिलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यापुर्वी काही आरोपींना गुडघ्यावर बसवून भररस्त्यातून फिरविण्यात (धिंड) आले होते. याप्रकरणाचेही व्हिडीओ व्हायरल झाले होते. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या दोन्ही व्हिडीओ संदंर्भाने ही चौकशी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश

पुणे पोलिसांकडूनही अंतर्गत चौकशी

भारती विद्यापीठ पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील याची दखल घेत या पुर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले होते. परिमंडळ दोनचे उपायुक्त मिलींद मोहिते यांच्याकडून याप्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित व्हि़डीओतील कर्मचारी व प्रभारी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून पडताळणी केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: The police have landed in trouble for parading the criminals in public

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
1

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
2

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता
3

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल
4

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.