Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निगडीतील २५ एकर जागेवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प वादात; नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन

निगडी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २६ येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सुमारे २५ एकर जागेवर प्रस्तावित असलेल्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाला प्रभाग क्रमांक १५ मधील चारही नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 27, 2026 | 02:47 PM
निगडीतील २५ एकर जागेवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प वादात; नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन

निगडीतील २५ एकर जागेवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प वादात; नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन

Follow Us
Follow Us:
  • निगडीतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाला नगरसेवकांचा विरोध
  • दाट लोकवस्तीमुळे आरोग्य व पर्यावरणाचा प्रश्न
  • प्रकल्प स्थलांतरित करण्याची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : निगडी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २६ येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सुमारे २५ एकर जागेवर प्रस्तावित असलेल्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाला प्रभाग क्रमांक १५ मधील चारही नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. दाट लोकवस्ती आणि परिसरातील पर्यटनस्थळांचा विचार करून हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ आणि नगरसेविका शैलजा मोरे यांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे निगडी प्राधिकरणासह परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रस्तावित जागेच्या आसपास दुर्गादेवी टेकडी, आप्पूघर, निगडी जलशुद्धीकरण केंद्र आणि रावेत परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. कचऱ्याची वाहतूक, साठवणूक आणि दहन प्रक्रियेमुळे दुर्गंधी, वायुप्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. तसेच, कचरा वर्गीकरण आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत नसल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा : शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू

या परिसरात यापूर्वी एन्व्हायर्नमेंट सेंटर, सेंट्रल पार्क आणि अर्बन फॉरेस्ट विकसित करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि जीवनमान लक्षात घेऊन प्रकल्पाबाबत निर्णय घ्यावा. लोकवस्तीपासून सुरक्षित अंतरावर असलेल्या पर्यायी जागेवर हा प्रकल्प उभारण्याबाबत महापालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : कामावर जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन कामगारांचा मृत्यू; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाला विरोध का होत आहे?

    Ans: दाट लोकवस्ती, वायुप्रदूषण आणि दुर्गंधीच्या संभाव्य धोक्यामुळे विरोध होत आहे.

  • Que: प्रकल्पाला विरोध करणारे नगरसेवक कोण आहेत?

    Ans: र्मिला बाबर, अमित गावडे, राजू मिसाळ आणि शैलजा मोरे.

  • Que: नगरसेवकांची प्रमुख मागणी काय आहे?

    Ans: निगडीतील प्रस्तावित प्रकल्प लोकवस्तीपासून दूर असलेल्या पर्यायी जागेवर स्थलांतरित करावा.

Web Title: Four corporators have opposed the waste to energy project in nigdi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Cabinet Meeting Decision:  १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
1

Cabinet Meeting Decision: १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

घटनास्थळी गोळी चाललीच नाही, मग पिस्तूल आले कुठून? राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांचा तपासही संशयाच्या भोवऱ्यात
2

घटनास्थळी गोळी चाललीच नाही, मग पिस्तूल आले कुठून? राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांचा तपासही संशयाच्या भोवऱ्यात

Farmers Death: धक्कादायक वास्तव! राज्यात 13928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबांना अद्याप मदतीची प्रतीक्षा
3

Farmers Death: धक्कादायक वास्तव! राज्यात 13928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबांना अद्याप मदतीची प्रतीक्षा

Torrent Power Karjat Project : टोरंट प्रकल्पामुळे वीजपुरवठा अधिक सक्षम होणार! आमदार महेंद्र थोरवेंचा प्रकल्पाला पाठिंबा
4

Torrent Power Karjat Project : टोरंट प्रकल्पामुळे वीजपुरवठा अधिक सक्षम होणार! आमदार महेंद्र थोरवेंचा प्रकल्पाला पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.