Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश

सांस्कृतिक तसेच विद्येची नगरी असलेल्या पुण्याची ओळख दिवसेंदिवस ड्रग्ज नगरी अशी देखील होत आहे. मात्र, ही ओळख मोढीत काढण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 06, 2026 | 01:03 PM
पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश

Follow Us
Follow Us:

पुणे : ड्रग्ज विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू असतानाच आता पुणे पोलिसांनी ‘डिमांड’ (पिणारे) करणाऱ्यांवर देखील वक्रदृष्टी वळविली आहे. डिमांड करणाऱ्यांवर देखील कारवाई सुरू केली असून, शहरात या मोहिमेअंतर्गत तब्बल २०८ जणांवर कारवाई केली आहे. यासोबतच पोलिसांकडून आता डिमांड करणाऱ्यांना पुनर्वसनाची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यांना एक महिना व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे कारवाईसोबतच पोलिसांनी व्यसनांच्या विळख्यातून तरुणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सांस्कृतिक तसेच विद्येची नगरी असलेल्या पुण्याची ओळख दिवसेंदिवस ड्रग्ज नगरी अशी देखील होत आहे. मात्र, ही ओळख मोढीत काढण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच पोलिसांनी कारवाईसोबतच आता ड्रग्जच्या सेवनातून मुक्ती अशी नवी रणनिती स्विकारली आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईला केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता, त्यांना व्यसनमुक्त जीवनाकडे वळविण्याचा मानवी दृष्टिकोन या मोहिमेला नवे स्वरूप दिले आहे.

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांसोबतच त्याचे सेवन करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. नव्या धोरणानुसार अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर तब्बल २०८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही मोहीम केवळ दंडात्मक न करता त्याला सामाजिक जबाबदारीची जोड दिली आहे. एनडीपीएस कायद्याच्या कलम ६४(ए) अंतर्गत कारवाई झालेल्या व्यसनाधीनांना व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्याची संधी दिली जात आहे. महिनाभराचा उपचारक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तींबाबत पोलिस सकारात्मक भूमिका घेणार आहेत. त्यामुळे शिक्षा आणि सुधारणा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

कायद्याचा बडगा अन् पुनर्वसनाची संधी

एनडीपीएस कायद्यातील कलम ६४ (अ) अंतर्गत संबंधितांना व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन उपचार घेण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. कारवाईतील व्यक्तींनी व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन महिनाभराचा उपचारक्रम पूर्ण केल्यास पोलिसांकडून त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे. मात्र, ही संधी नाकारल्यास किंवा न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य न केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘डिमांड’ आणि ‘सप्लाय’ या दोन्ही बाजूंवर एकाच वेळी कारवाई करण्याचे थेट आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : ऑनलाइन गेमिंगच्या नादात दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल बनला एटीएम चोर; टोळीला दिले हॅकिंगचे प्रशिक्षण

पुणे पोलिसांच्या नव्या ड्रग्जविरोधी मोहिमेची वैशिष्ट्ये

‘डिमांड’ आणि ‘सप्लाय’ दोन्ही साखळ्यांवर एकाचवेळी कारवाई

शहरात २०८ कंझम्प्शन गुन्हे

ड्रग्ज पेडलर्स आणि सेवन करणारे दोघेही पोलिसांच्या रडारवर

एनडीपीएस कायदा कलम ६४(ए) अंतर्गत उपचाराची संधी

व्यसनमुक्ती केंद्रात महिनाभर उपचार पूर्ण करणाऱ्यांबाबत सकारात्मक विचार

उपचार नाकारणाऱ्यांवर आणि न्यायालयात असहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई

Web Title: The pune police commissioner has ordered action against drugs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.