Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : युट्यूबवरील गाण्यावर नृत्य; विश्रांतवाडीतील विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

सांस्कृतिक कार्यक्रमात युट्यूबवरील एका गाण्यावर नृत्य सादरीकरण केल्याप्रकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांना पुणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 15, 2026 | 01:48 PM
युट्यूबवरील गाण्यावर नृत्य; विश्रांतवाडीतील विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

युट्यूबवरील गाण्यावर नृत्य; विश्रांतवाडीतील विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:

पुणे : सांस्कृतिक कार्यक्रमात युट्यूबवरील एका गाण्यावर नृत्य सादरीकरण केल्याप्रकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांना पुणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना अटी व शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आणि आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन त्यांच्या वतीने वकिलांनी कोणतीही फी न घेता संपूर्ण न्यायालयीन लढा पूर्णपणे विनामूल्य, म्हणजेच ‘प्रो बोनो’ लढवला.

 

नेमकं प्रकरण काय?

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दोन विद्यार्थ्यांनी एका युट्यूबवरील गाण्यावर नृत्य सादर केले होते. मात्र, सदर गाणे हे कथितरित्या माओवादी नेता हिडमा मडवी याच्या जीवनावर आधारित असल्याचा आरोप करत, यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा पोलिसांनी केला. याप्रकरणी पोलीस काँस्टेबल शब्बीर शेख यांच्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात झालेला युक्तिवाद

अटक होण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड. अभिषेक रंधवे, अ‍ॅड. श्वेतल वहाणे आणि अ‍ॅड. श्रेयश बापते यांनी न्यायालयात बाजू मांडली. बचाव पक्षाच्या वतीने वकिलांनी जोरदार युक्तिवाद करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की: अर्जदार हे विद्यार्थी असून त्यांचा कोणताही देशविरोधी संदेश प्रसारित करण्याचा किंवा राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणण्याचा कोणताही दुर्भावनापूर्ण हेतू नव्हता. केवळ एका युट्यूबवर उपलब्ध असलेल्या गाण्यावर अनवधानाने केलेले नृत्य सादरीकरण हा गुन्हेगारी कट असू शकत नाही. तपास अधिकाऱ्यांनी आधीच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (आताच्या BNSS) आवश्यक नोटीसचे पालन केले असून, आरोपींची कोणतीही पोलीस कोठडी किंवा प्रत्यक्ष कस्टडी घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा : खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग, दीड वर्षात 20 सापळे कारवाया; सर्वसामान्यांमध्ये अविश्वासाची भावना

न्यायालयाचा निर्णय

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि बचावाचा हेतू प्रामाणिक असल्याचे ग्राह्य धरून, अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला. त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याच्या आणि तपासात अडथळा न आणण्याच्या अटींवर या विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Web Title: The sessions court has granted bail to two students from vishrantwadi who performed a dance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Pune Crime
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
1

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
2

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
3

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
4

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.