Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashwini Bidre प्रेमात झाले अंध, कुटुंबे उद्ध्वस्त: अश्विनी बिद्रे-अभय कुरुंदकर प्रेमकहाणीचा करुण अंत

पती राजू गोरे यांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. यानंतर तपासाला गती मिळाली. तपासात कुरुंदकर यांच्या संगणकाची झडती घेण्यात आली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 22, 2025 | 11:05 AM
Ashwini Bidre, Ashwini Bidre News

Ashwini Bidre, Ashwini Bidre News

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: अश्विनी बिद्रे  Ashwini Bidre पोलिस दलात २००५ साली रूजू झाल्या. सांगलीत पोस्टिंग असताना त्यांची अभय कुरुंदकरशी ओळख झाली. पुढे दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. अश्विनी आणि अभय कुरूंदकर दोघेही पूर्वीच विवाहित होते. कुरूंदकरला पत्नीसह दोन मुले आहेत. कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यामुळे अश्विनी यांनी पती राजू गोरेसोबतचे संबंध तोडले. अश्विनी यांना राजू गोरेपासून एक मुलगी आहे. तिचा सांभाळ राजू गोरेच करत आहेत. पण, प्रेमात अंधळे झालेल्या कुटुंबातील पोलिस अधिकाऱ्याच्या कृत्याने दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली

अश्विनीने अभय कुरूंदकरकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, कुरूंदकरला अश्विनीशी लग्न करायचेच नव्हते. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होत होती. मात्र कुरूंदकर पहिल्या पत्नीला, मुलांना सोडू शकत नव्हता तर बिद्रे यांनी लग्नाचा तगादा लावल्याने एकदाची कटकट संपवावी म्हणून त्यांची हत्या करण्याचा डाव रचला. यासाठी त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सोबत घेतले व अश्विनीला संपवून टाकले. या प्रकरणात या दोघांना भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील आणि कारचालक कुंदन भांडारी यांनीही साथ दिली. अभय कुरूंदकरने अश्विनी बिद्रेचे अपहरण करून हत्या केली. महेश फळणीकर राजू पाटीलच्या मदतीने वसई-भाईंदरच्या खाडीत फेकत त्याची विल्हेवाट लावली. अश्विनी बिद्रे यांची हत्या केली त्यावेळी अभय कुरुंदकर ठाणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होता

कुरुंदकरचा चालक, मित्रही सहभागी

२७ ऑक्टोबर २०१६ ला न्या. ए एस ओक आणि ए.ए. सय्यद यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना डिसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली टीम नियुक्त करून तत्काळ अहवाल दाखल करण्याचा आदेश दिला. ३१ जानेवारी २०१७ ला खून करण्याच्या उद्देशून अपहरण करणे आदींबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरवर कंळबोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अभय कुरूंदकरचा खासगी ड्रायव्हर आणि त्याचा मित्र महेश फळणीकर यांनाही अटक करण्यात आली

मेहुण्याला केला होता मेसेज

अश्विनी यांची हत्या केल्यानंतर त्या जिवंत आहेत, असे भासवण्यासाठी कुरूंदकरने अश्विनी यांच्या मोबाईलवरून मेहूणे अविनाश गंगापूरे यांना व्हॉट्सअप मेसेज केला होता. मानसिक अस्वास्थ्यामुळे आपण उपचार घेण्यासाठी ५ ते ६ महिने उत्तरांचल किंवा हिमाचलला जाणार आहोत, असे या मेसेजमध्ये म्हटले होते.

‘Y’ आणि ‘U’मुळे गुन्ह्याची उकल

अतिशय शांत डोक्याने तसे प्लॅनिंग करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर यानेच अश्विनी यांची हत्या केल्याचा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागणे अवघड होते. मोवाईल चॅटिंगमधील केवळ एका अक्षरावरून कुरूंदकर हाच मारेकरी असल्याचे समोर आले आणि तपासाला गती मिळाली. अश्विनी यांच्या मोबाईलवरून ‘हाऊ आर यू’ हा प्रश्न विचारताना कुरूंदकरने ‘यू’ लिहिताना ‘वाय’, (Y) हे अक्षर वापरले. मात्र अश्विनी कधीही ‘यू’ लिहिताना वापरत नसत त्या नेहमी Y वापरत असत. हाच धागा पकडून गुन्हे शाखेने कुरूंदकरच्या मुसक्या आवळल्या होत्या.

घटनाक्रम

हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील मनसेचे उपजिल्हा प्रमुख राजू गोरे यांचा विवाह स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या अश्विनी बिद्रे यांच्याशी झाला होता. अश्विनी यांचे पहिले पोस्टिंग पुणे येथे झाले होते. त्यानंतर त्यांची बदली सांगली येथे झाली, जिथे त्यांची ओळख पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी झाली.

या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. नोकरीदरम्यान कुरुंदकर यांची बदली रत्नागिरी येथे झाली. रत्नागिरीत असतानाही ते अश्विनीला वारंवार भेटण्यासाठी येत असत. या प्रेमसंबंधाची कुणकुण अश्विनी यांचे वडील आणि पती राजू गोरे यांना लागली.काळानुसार अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यात वाद सुरू झाले. वाद वाढत गेले, आणि एका क्षणी कुरुंदकर यांनी फोनवरून अश्विनीच्या पती आणि मुलीला बेपत्ता करण्याची धमकी दिली होती.

यानंतर अश्विनी यांची बदली रत्नागिरी येथून ठाणे जिल्ह्यातील कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र, कळंबोली पोलीस ठाण्यात अश्विनी हजर झाल्या नाहीत. यावरून पोलीस दलाने त्यांच्या कुटुंबीयांना पत्राद्वारे विचारणा केली.जुलै २०१६ मध्ये अश्विनी बिद्रे गोरे यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी नोंदवली. मात्र, त्याकडे सुरुवातीला पोलीस दलाने दुर्लक्ष केले. तत्कालीन अधिकारी हेमंत नगराळे यांनी तक्रारीची योग्य ती दखल घेतली नाही.

पती राजू गोरे यांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. यानंतर तपासाला गती मिळाली. तपासात कुरुंदकर यांच्या संगणकाची झडती घेण्यात आली, ज्यात अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यातील प्रेमसंबंध व वादाचे अनेक संवाद सापडले.हे पुरावे सापडल्यानंतर कुरुंदकर यांनी रजा घेतली. ११ एप्रिल २०१६ रोजी मीरा रोड येथील त्यांच्या फ्लॅटवर अश्विनी बिद्रे यांचा अमानुष खून करण्यात आला असल्याचा धक्कादायक तपासात उलगडा झाला.

Web Title: The tragic end of the ashwini bidre abhay kurundkar love story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • Ashwini Bidre
  • crime news
  • kolhapur

संबंधित बातम्या

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास
1

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

सोमेश्वरनगरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
2

सोमेश्वरनगरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

तीन महिन्यांच्या चिमूकल्याचा अंत अन् आईने उचलले भयंकर पाऊल; राहत्या घरी थेट…
3

तीन महिन्यांच्या चिमूकल्याचा अंत अन् आईने उचलले भयंकर पाऊल; राहत्या घरी थेट…

Crime News : वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक! नांदेड ग्रामीण पोलिसांचा ‘ऑपरेशन फ्लश आऊट’चा दणका
4

Crime News : वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक! नांदेड ग्रामीण पोलिसांचा ‘ऑपरेशन फ्लश आऊट’चा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.