crime (फोटो सौजन्य: social media)
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. लग्न होताच नवरीने आपल्या पतीला आणि सासरच्याला असं सरप्राईज दिल की यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. नवरदेवाच्या कुटुंबाला देखील यामुळे मोठा धक्का बसला आहे. नेमकं घडलं तरी काय? काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
घटना उत्तर प्रदेशमधील बांकपूर गावामधील आहे. येथील रहिवासी रामगोपाल नावाच्या तरुणाचं लग्न अनेक वर्षांपासून होत नव्हतं. आपल्या मुलाचं लग्न होत नाही म्हणून रामगोपालचं कुटुंब चिंतेत होतं. यादरम्यान त्याच्या गावातील गोकुळ वर्मा याने रामगोपालच्या कुटुंबाला एका तरुणीचा फोटो दाखवला. रामगोपालच्या कुटुंबाला ही मुलगी आवडली आणि लग्नासाठी ते देखील तयार झाले.
आधी दिली धमकी; पेट्रोल घेऊन शेतकरी शिरला आमदाराच्या घरात, काळजाचा ठोकाच चुकला; काय घडलं पहा?
तरुणीच्या घरी गेले, मागणी घातली, लग्न जुळलं. मात्र ट्विस्ट तेव्हा आलं जेव्हा ट्रूनुईच्या वडिलांनी लग्नासाठी रामगोपालच्या कुटुंबाकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर मुलाचं लग्नच जमत नसल्यामुळे त्याच्या वडिलांनी देखील आपले सर्व दागिने विकून दोन लाख रुपये जमा केले. त्यानंतर लग्न जमलं, एका मंदिरामध्ये त्या दोघांचं लग्न लावण्यात आला. लग्नाच्या विधी पूर्ण होताच मुलाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांना दोन लाख रुपये दिले.
लग्न लागलं, लग्नाच्या विधी पूर्ण झाल्या जेव्हा विदाईची वेळ आली तेव्हा गोकुळ वर्मा आणि या मुलीच्या वडिलांनी म्हंटल की, तिला बाथरूमला जायचं आहे. त्यानंतर सर्व जण आपल्या आपल्या कामाला लागले, संधी मिळताच गोकुळ आणि या मुलीचे वडील तिला घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. बराचवेळ शोध घेऊन देखील ते तिघे सापडले नाही. अखेर त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. अधिक तपास करत असल्याची माहिती घटनास्थळावरून फरार झाले. तेव्हा बराचवेळ शोध घेऊन देखील ते तिघे न सापडल्यामुळे अखेर त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दोन लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाले आहेत. या कुटुंबाची मोठी फसवणूक झाली आहे. या घटनेबाबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.