Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलगा की सैतान? दारुसाठी पैसे देत नाही म्हणून केला आईचा खून; तासगावातील घटना

एका तरुणाने दारुसाठी पैसे देत नाही म्हणून आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं आपल्या आईला जमिनीवर पाडून तिला तलवारीने भोसकलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 17, 2025 | 05:17 PM
मुलगा की सैतान? दारुसाठी पैसे देत नाही म्हणून केला आईचा खून; तासगावातील घटना

मुलगा की सैतान? दारुसाठी पैसे देत नाही म्हणून केला आईचा खून; तासगावातील घटना

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली
  • दारुसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाने केला आईचा खून
  • धक्कादायक घटनेनं तासगाव हादरले
तासगाव : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता तासगावमधून एक मोठी घटना समोर आली आहे. एका तरुणाने दारुसाठी पैसे देत नाही म्हणून आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं आपल्या आईला जमिनीवर पाडून तिला तलवारीने भोसकलं आहे. पोटच्या मुलानेच अशाप्रकारे जन्मदात्या आईचा खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

तासगावमधील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये शांताबाई चरण पवार (वय ७०) या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शांताबाई यांचा मुलगा जगन चरण पवार (वय ४४) घरी आला. जगनला दारुचे व्यसन आहे. यावेळी जगन हा दारूच्या नशेत होता. रात्री उशिरा घरी आल्यानंतर जगन त्याच्या आईशी दारुसाठी पैसे देत नाही म्हणून वाद घालू लागला. पैशावरुन तीव्र वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या जगनने आई शांताबाई यांना धक्का दिला. त्या खाली जमिनीवर कोसळल्या. यावेळी संतापाच्या भरात जगनने घरात असलेली तलवार काढली आणि जमिनीवर पडलेल्या आईला तलवारीने भोसकले. भोसकल्यामुळे शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत संशयित मुलगा जगन पवार याला ताब्यात घेतले. मध्यरात्री त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

हॉटेलमध्ये वेटरकडून ग्राहकावर हल्ला

मावळ तालुक्यातील जांभूळ गावात जुने मुंबई–पुणे महामार्गालगत असलेल्या सनराईज हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन वेटरनी ग्राहक आणि त्याच्या मुलावर लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अज्ञात वेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ६ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास जांभूळ गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत सदानंद संजु चौधरी (वय ५०, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. गावठाण, कामशेत) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: There has been a case of a son killing his mother because she did not pay for alcohol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 05:17 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Tasgaon Crime

संबंधित बातम्या

Crime News: कोकणातील ‘या’ नदीतून अवैध वाळू उपसा; पोलिसांनी तिघांना थेट…
1

Crime News: कोकणातील ‘या’ नदीतून अवैध वाळू उपसा; पोलिसांनी तिघांना थेट…

Chhatrapati Sambhajinagar: चिनी मांजा विक्रीप्रकरणी ५ विक्रेते ताब्यात; विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून ‘धिंड’ काढण्याची मागणी
2

Chhatrapati Sambhajinagar: चिनी मांजा विक्रीप्रकरणी ५ विक्रेते ताब्यात; विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून ‘धिंड’ काढण्याची मागणी

Kolhapur Accident : ऊसाने भरलेल्या ट्रकची वाहनांना जोरदार धडक; पाचजण गंभीर, वाहतूक ठप्प
3

Kolhapur Accident : ऊसाने भरलेल्या ट्रकची वाहनांना जोरदार धडक; पाचजण गंभीर, वाहतूक ठप्प

धक्कादायक ! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या; मानेवर केला चाकूने वार अन् नंतर…
4

धक्कादायक ! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या; मानेवर केला चाकूने वार अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.