Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात यंदाही चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दर्शनासाठी आलेल्या महिला व पुरूष भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 12, 2026 | 04:30 PM
वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात यंदाही चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दर्शनासाठी आलेल्या महिला व पुरूष भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: वारकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी कडेकोट पोलिस तैनात असताना देखील या चोऱ्या झाल्या आहेत. पोलिसांकडून साध्या गणवेशातील पोलिस व इतर पथके असतानाही या चोऱ्या घडल्या आहेत. एकूण ११ घटना घडल्या असून, त्यापैकी ९ घटना एकट्या हडपसर परिसरात नोंदविण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, पोलिसांनी ८९ सशंयितांना पकडले होते. पण, तरीही या घटना घडल्या आहेत. मांजरी, समर्थ तसेच हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी एकूण ३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या घटना दर्शनासाठी आल्यानंतर घडल्या आहेत. पालखी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी बाहेर पडतात. पालखी मार्ग देखील गर्दीने भरून गेलेला असतो. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात येतो. मात्र, अशा स्थितीत देखील चोरटे मात्र त्यांची कामगिरी चोख पार पाडत असल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा : संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

वारी सोहळ्यात त्यात विशेषत: हडपसर भागात दर‌वर्षी अशा घटना घडत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा या घटनांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलिसांकडून प्रभावी नियंत्रण मिळविण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही, ड्रोन आणि तांत्रिक यंत्रणा तैनात असतानाही चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावल्या आहेत. वारकरी आणि नागरिकांनीही गर्दीत मौल्यवान दागिने वापरताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरु

‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक

ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची ४ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला कोंढव्यातील लुल्लानगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतात, असे आमिष दाखविले होते. महिलेला सुरुवातीला एक काम दिले. या कामाचे पैसे महिलेच्या खात्यात जमा करण्यात आले. परतावा मिळाल्यानंतर महिलेचा विश्वास बसला. नंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने चार लाख ३१ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर तिला परतावा देण्यात आला नाही. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रशांत मंडले तपास करत आहेत.

Web Title: An incident involving the theft of a gold chain by thieves occurred during the wari sohla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • crime news
  • Gold Theft
  • Pune Theft

संबंधित बातम्या

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
2

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
3

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
4

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.