Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात झाला असून, या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2026 | 12:30 AM
‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 'इतक्या' लाखांना घातला गंडा

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 'इतक्या' लाखांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात झाला असून, या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिक हे बंडगार्डन रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना मोबाइलद्वारे संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. ‘ज्येष्ठ नागरिकाच्या नावे बँकेत बनावट खाते उघडण्यात आले आहे. या खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अटकेची (डिजिटल ॲरेस्ट) कारवाई करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील’, अशी भीती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखविली होती.

बँक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी एका खात्यात तातडीने २१ लाख रुपये जमा करावे लागतील, असेही सांगण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबा पोटे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत

‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक

ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची ४ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला कोंढव्यातील लुल्लानगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतात, असे आमिष दाखविले होते. महिलेला सुरुवातीला एक काम दिले. या कामाचे पैसे महिलेच्या खात्यात जमा करण्यात आले. परतावा मिळाल्यानंतर महिलेचा विश्वास बसला. नंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने चार लाख ३१ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर तिला परतावा देण्यात आला नाही. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रशांत मंडले तपास करत आहेत.

Web Title: Cyber fraudsters have duped a senior citizen by threatening them with digital arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Fraud Case

संबंधित बातम्या

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
1

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…
3

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ
4

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.