Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; दोन वेगवेगळ्या प्रकरणांत लाखोंची फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून दोन वेगवेगळ्या प्रकरणांत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 16, 2026 | 12:30 AM
पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; दोन वेगवेगळ्या प्रकरणांत लाखोंची फसवणूक

पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; दोन वेगवेगळ्या प्रकरणांत लाखोंची फसवणूक

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून दोन वेगवेगळ्या प्रकरणांत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. कारवाईची भीती दाखवून एका तरुणाकडून ४ लाख ८१ हजार रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. तर शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

पहिल्या प्रकरणात चंदननगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. चोरट्यांनी तरुणाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एका खासगी वित्तीय संस्थेकडून ऑनलाइन पद्धतीने कर्ज घेतले असून त्याचे हप्ते थकले असल्याचे सांगितले. हप्ते भरले नाहीत तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी भीती दाखवत चोरट्यांनी तरुणाला जाळ्यात ओढले. कारवाईची भीती दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडून वेळोवेळी ४ लाख ८१ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने आपल्या खात्यात जमा करून घेतले. पैसे दिल्यानंतरही चोरट्यांकडून त्याला धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने अखेर चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख करत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कात्रज परिसरातील आंबेगाव येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची १७ लाख रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना विविध कारणे सांगत वेळोवेळी १७ लाख रुपये आपल्या खात्यात जमा करण्यास भाग पाडले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : संभाजीनगरमध्ये डॉक्टरला 5 लाखांची मागणी; पोलिसांकडून ‘फिल्मी’ स्टाईलने भांडाफोड, माजी नगरसेविकेसह 6 जणांना अटक

पुण्यात अटकेची भीती दाखवत ज्येष्ठ नागरिकाला लुटले

सायबर चोरट्यांनी पुन्हा एका जेष्ठ नागरिकाला ‘तुम्हाला कोर्टाच्या परवानगीने डिजिटल अरेस्ट केले आहे’ अशी बतावणी करून तब्बल २ कोटी ७४ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांना एक-दोन दिवस नव्हे तर दोन महिने भीतीच्या छायेत ठेवत त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेतले आहेत. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. याबाबत कोथरूडमध्ये राहणाऱ्या ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे.

Web Title: There has been an incident in pune city where cyber thieves have cheated two people of lakhs of rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Froud News

संबंधित बातम्या

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
1

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
2

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
3

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.