Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; बंदूक दाखवून धमकी दिली अन्…

प्रेमसंबंधाच्या संशयातून असिस्टंट मॅनेजर तरुणाला बंदूक दाखवून, कमरेचा पट्टा व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 27, 2025 | 12:07 PM
पुण्यात तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; बंदूक दाखवून धमकी दिली अन्...

पुण्यात तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; बंदूक दाखवून धमकी दिली अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : प्रेमसंबंधाच्या संशयातून असिस्टंट मॅनेजर तरुणाला बंदूक दाखवून, कमरेचा पट्टा व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, पोलिस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे, ती तुझ्याविरोधात खोटी तक्रार करणार आहे, तुला अडचणीत आणेल अशी धमकीही दिली. ही धक्कादायक घटना २१ जून रोजी रात्री साडेआठ वाजता वाघोलीतील सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलच्या मैदानात घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी आदर्श चौधरी (२४, रा. लोणावळा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुण विमाननगरमधील खाजगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहे. कंपनीतील एका तरुणीच्या ओळखीतून त्याची आदर्श चौधरीशी एप्रिल २०२५ मध्ये ओळख झाली होती. नंतर दोघांत काहीही संपर्क नव्हता. २१ जून रोजी कंपनीतून बाहेर आला असता त्याला येथे आदर्श आल्याचे समजले. त्याने आदर्शला फोन करून भेट घेतली. त्यानंतर दोघं एकत्र दुचाकीवरून वाघोलीच्या सेंट जोसेफ स्कूलच्या मोकळ्या मैदानात गेले.

तेथे आदर्शने आधी बोलण्यास सुरुवात केली. नंतर मात्र अचानक रागाने म्हणाला, “माझे तिच्यासोबतचे प्रेमसंबंध संपले, आणि त्याला तू कारण आहेस. मी तुझ्या आयुष्याची वाट लावणार !” असे म्हणून त्याने लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली. कमरेचा बेल्ट काढून मारले. यावेळी त्याने बंदूक दाखवत धमकी दिली की, “तुला इथे मारले, तर कोणालाही कळणार नाही. तुझ्या घरचा पत्ता काढू शकतो.”

एवढ्यावर न थांबता, त्याने आणखी एक खेळी खेळली. म्हणाला, “विमाननगर पोलिस चौकीबाहेर एक मुलगी उभी आहे, ती तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करणार आहे.” मारहाणीनंतर आरोपी तेथून दुचाकीवरून निघून गेला. जखमी अवस्थेत तरुणाने त्याच्या मित्राला बोलावले व घरी जाऊन उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाला. उपचारानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Web Title: There has been an incident in pune where a young man was brutally beaten with a wooden stick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
1

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
2

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
3

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
4

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.