Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : ठेकेदाराने महानगरपालिकेला लावला लाखोंचा चुना; खोट्या सह्या केल्या अन्…

कोल्हापुरात एका ठेकेदाराने महानगरपालिकेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून ८५ लाखाचं बिल मिळवले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 24, 2025 | 01:25 PM
ठेकेदाराने महानगरपालिकेला लावला लाखोंचा चुना; खोट्या सह्या केल्या अन्...

ठेकेदाराने महानगरपालिकेला लावला लाखोंचा चुना; खोट्या सह्या केल्या अन्...

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापुरात एका ठेकेदाराने महानगरपालिकेला लाखोंचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष काम न करता कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून ठेकेदारानं ८५ लाखाचं बिल मिळवल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराने देखील आपण खोट्या सह्या आणि कागदपत्रांचा वापर करून हे बिल मिळवलं असल्याच कबुल केलं आहे. या प्रकारामुळे मात्र महानगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाचे संघटक असलेल्या सत्यजित कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कसबा बावड्यात असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमधील ड्रेनेज कामाबाबतचा हा सगळा प्रकार उघडकीस आणला होता. सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप करताना सांगितले ठेकेदारानं आपल्या कृत्याची लेखी कबुली महानगरपालिकेला दिली आहे. दरम्यान महानगरपालिका प्रशासनाकडूनही या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली असून, महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना देखील याबाबत लेखी खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय संबंधित ठेकेदारांसह या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान याप्रकरणी ठेकेदाराने खोट्या सह्या केल्याची कबुली दिली तर महानगरपालिकेने संबंधित ठेकेदारावर अद्याप गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणांमध्ये महानगरपालिकेतील तत्कालीन अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याची शक्यता प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी व्यक्त केली असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची देखील मागणी देसाई यांनी केली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासकराज आहे. एका बाजूला शहरासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी येत असताना ठेकेदार किती सहजपणे महानगरपालिकेची फसवणूक करत आहेत हेच या एका उदाहरणावरून समजू शकेल. आता हा फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर तरी महानगरपालिका प्रशासन विकासकामं आणि त्यांच्या ठेकेदाराबाबत सजग होणार का? हे पाहावं लागणार आहे.

हे सुद्धा वाचा : अंबिका कला केंद्रात गोळीबार; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल

गुंतवणुकीवर नफा देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक

आमच्याकडे सरकारी टेंडर घेण्याचा परवाना आहे. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगत एका व्यक्तीची दोघांनी ३ कोटी ९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी मोहित ढाकण (रा. मुंबई) यांनी मार्केटयार्ड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिासांनी करण दिलीप बोथरा, सोम्या करण बोथरा (रा.सॅलीसबरी पार्क) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे.

Web Title: There has been an incident of a contractor in kolhapur defrauding the municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • kolhapur
  • kolhapur news

संबंधित बातम्या

ईडी कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा
1

ईडी कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा

सोलापूर शहर भाजपमध्ये धुसफूस; कार्यकारिणी निवड जाहीर करताच ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
2

सोलापूर शहर भाजपमध्ये धुसफूस; कार्यकारिणी निवड जाहीर करताच ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

Crime News Live Updates : पतीने पत्नीच्या मामाला चाकूनं भोसकून संपवलं, जळगावातील घटनेने खळबळ
3

Crime News Live Updates : पतीने पत्नीच्या मामाला चाकूनं भोसकून संपवलं, जळगावातील घटनेने खळबळ

Disha Patani: बॉलीवूड हादरलं! अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गॅंगस्टर्सनी घेतली जबाबदारी
4

Disha Patani: बॉलीवूड हादरलं! अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गॅंगस्टर्सनी घेतली जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.