Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य; तरुणीने व्हिडीओ बनवला अन्…

चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर कंपनीच्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या २४ वर्षीय तरुणीसमोर एका अनोळखी व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2026 | 01:26 PM
संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य; तरुणीने व्हिडीओ बनवला अन्...

संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य; तरुणीने व्हिडीओ बनवला अन्...

Follow Us
Follow Us:
  • तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य
  • चिंचवड परीसरातील संतापजनक प्रकार
  • तरुणीने बनवला व्हिडीओ
पिंपरी : चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर कंपनीच्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या २४ वर्षीय तरुणीसमोर एका अनोळखी व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित तरुणीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना बुधवारी (दि. २१) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघाली होती. तिने एम्पायर इस्टेट परिसरात आपली दुचाकी पार्क केली आणि कंपनीच्या बसची वाट पाहण्यासाठी बीआरटी बसथांब्यावर जाऊन थांबली. सुरुवातीला बसथांब्यावर कोणीही नसल्याने ती एकटीच उभी होती. काही वेळाने एक अनोळखी व्यक्ती तेथे आला आणि तिच्यासमोर तिरप्या बाकावर बसला.

संबंधित व्यक्ती वारंवार तरुणीकडे पाहत सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करू लागला. हा प्रकार लक्षात येताच तरुणी घाबरली. मात्र, धाडस दाखवत तिने त्या व्यक्तीला जाब विचारला. त्याचवेळी तिने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. आपले चित्रीकरण होत असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्ती तेथून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बस अन् दुचाकीच्या धडकेत 4 तरुणांचा जागीच मृत्यू

परळीत 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग

बीड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तू मेरे साथ शादी कर वरना भगाके ले जाऊंगा असे म्हणत पीडित तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना बीड जिल्ह्यातील परळीत घडली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव अमृ शेख असे आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार 18 वर्षीय पिढीत तरुणी ही घरकाम करते. 22 मे रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीला अडवून माझ्याशी विवाह कर अन्यथा तुला पळवून नेईल अशी धमकी दिली होती. यानंतर तरुणीचा हात ओढत तिचा विनयभंग देखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: There has been an incident of a man committing an obscene act in front of a young woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pimpri-Chinchwad News

संबंधित बातम्या

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद
1

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
2

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
3

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला
4

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.