Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी…; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी

सोशल मिडीयाच्या माध्यमातून झालेली ओळख एका मिठाई विक्रेत्याला चांगलीच महागात पडली. महिलेने मिठाई विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 05, 2025 | 05:41 PM
प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी...; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी

प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी...; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे, धमक्या यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे.  सोशल मिडीयाच्या माध्यमातून झालेली ओळख एका मिठाई विक्रेत्याला चांगलीच महागात पडली. महिलेने मिठाई विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय विक्रेत्याने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार स्नेहा मोहित कदम (वय ३०, रा. सांगली) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे लक्ष्मी रस्त्यावर मिठाई विक्रीचे दुकान आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून विक्रेत्याची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. नंतर आरोपी महिलेने त्यांना जाळ्यात ओढले. २५ सप्टेंबर रोजी महिला लक्ष्मी रस्त्यावर मिठाई विक्री दुकानात आली. मिठाई विक्रेत्याची कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी देऊन दुकानाच्या गल्ल्यातील ५०० रुपये आणि मिठाईचे खोके घेऊन गेली. त्यानंतर महिला पुन्हा मिठाई विक्रेत्याला भेटण्यास आली. कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन ७० हजार रुपये घेतले.

७० हजार रुपये घेतल्यानंतर आरोपी महिलेने पुन्हा धमकावून हे प्रकरण मिटविण्यास २ लाख रुपये मागितले. तेव्हा मिठाई विक्रेत्याने तिला दुकानात बोलाविले. दुकानात दोन लाख रुपये देतो, असे सांगितले. तेव्हा तिने दुकानात येण्यास नकार दिला. ऑनलाइन पद्धतीने २ लाख रुपये पाठविण्यास सांगितले. मिठाई विक्रेत्याने आरोपी महिलेच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने २५ हजार रुपये पाठविले. महिलेच्या धमकीमुळे घाबरलेल्या मिठाई विक्रेत्याने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली. सहायक निरीक्षक शीतल जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद

रांजणगाव एमआयडीसी परिसरात किरकोळ वादातून घरात घुसून हल्ला करत तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या दोघांना केवळ दोन तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ओंकार सिताराम वाळके आणि विजय ज्ञानेश्वर जगधने (दोघेही रा. कोरेगाव, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे.

Web Title: There has been an incident of a woman threatening a sweet vendor in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.