Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियावरील ओळख महिलेला पडली महागात; तरुणाने लाखो रुपयांना घातला गंडा

सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने एका महिलेची फसवणूक केली आहे. महिलेला तब्बल चार लाख ८० हजार रुपयांना गंडा घातला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 25, 2025 | 12:30 AM
सोशल मीडियावरील ओळख महिलेला पडली महागात; तरुणाने लाखो रुपयांना घातला गंडा

सोशल मीडियावरील ओळख महिलेला पडली महागात; तरुणाने लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगत महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने महिलेला लग्नाचे आमिषही दाखविले होते. वानवडीतील फातिमानगर येथील ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरू वानवडी पोलिसांत शिरीष जयंतीलाल गोहेल उर्फ चिराग मित्तल (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ जुलै २०२४ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणाची तक्रारदार महिलेशी फेसबुकवर ओळख झाली होती. नंतर त्याने स्वतःची ओळख सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच, लायसन्सधारक इथिकल हॅकर असल्याचे भासवून त्याने महिलेसोबत मैत्री वाढवली. काही दिवसांनी त्याने महिलेला लग्नासाठी विचारणा केली. ओळखीतून त्याने वेळोवेळी आपल्या हृदय शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी, बहिणीच्या प्रसूतीसाठी आणि अन्य वैयक्तिक कारणांसाठी महिलेकडून ऑनलाइन, धनादेशद्वारे आणि रोख स्वरूपात मिळून चार लाख रुपये घेतले.

याशिवाय, महिलेकडील सोन्याचे दागिने, एक सोनसाखळी आणि दोन अंगठ्या वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीत गहाण ठेवून त्यावर ८० हजार रुपयांचे कर्ज काढले आणि ते स्वतःसाठी खर्च केले. अशा प्रकारे एकूण मिळून त्याने महिलेची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वानवडी पोलिस याचा तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : भरदुपारी दोघांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटले; आरडाओरडा केला, पण…

मुकादमाने केली ऊस वाहतूकदाराची फसवणूक

ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून मुकादमाने ऊस वाहतूकदाराकडून ७ लाख ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ऊस वाहतूकदार रामचंद्र सीताराम चव्हाण (रा. चोभे पिंपरी, ता. माढा) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत उसतोड मुकादम संजय मानसाराम निकम (रा. खामखेडा, ता. देवळा, जि. नाशिक) याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

गेल्या काही दिवसाखाली शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची ४० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे.  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

Web Title: There has been an incident of a young man cheating on a woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Froud News
  • Pune Crime

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्…; नागपुरातील घटनेनं खळबळ
1

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्…; नागपुरातील घटनेनं खळबळ

मोर्शी नगर परिषदेच्या छतावरील पार्टी चर्चेत, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने खळबळ
2

मोर्शी नगर परिषदेच्या छतावरील पार्टी चर्चेत, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने खळबळ

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले
3

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश
4

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.