Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

महिंद्रा कंपनीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कामगारांमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी कोयत्यानेही हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 18, 2025 | 05:00 PM
महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यात गुन्हेगारीसंदर्भातल्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. खून, हाणामाऱ्या, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना दररोज राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागात घडत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. महिंद्रा कंपनीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कामगारांमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी कोयत्यानेही हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.

या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोहेल चुन्ना खान (३७, रा. आकुर्डी) यांच्या तक्रारीवरून सुरज सरोदे (२५), प्रतीक उबाळे (२३), अंशु रोकडे (२२) आणि प्रथमेश (२५, सर्व रा. घरकुल, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पेंटिंगचे तर आरोपी वॉशिंगचे काम करतात. शनिवारी कंपनीतील लाईट गेल्यानंतर परत आल्यावर फिर्यादीने कॉम्प्रेसर सुरू केला. त्यावर आरोपी सुरज सरोदे याने “कॉम्प्रेसर सुरू कर” अशी सूचना केली. मात्र, “मी आधीच सुरू केला आहे” असे फिर्यादीने सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला. वादातून सुरज सरोदेसह इतर तिघांनी मिळून सोहेल खान यांना मारहाण केली. दरम्यान, प्रथमेश याने सोबत आणलेल्या कोयत्याने भांडण सोडविण्यास आलेल्या गाझी शेख व चांद शेख या फिर्यादीच्या मित्रांवर हल्ला करून जखमी केले. तसेच आरोपींनी “ठार मारू” अशी धमकीही दिली. निगडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला

पुण्यातील लोहगाव भागातून एक घटना समोर आली आहे. लोहगाव भागात वैमनस्यातून टोळक्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (वय ४८, रा. मोझे आळी, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्र्रयत्न केल्याप्रकरणी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार उर्फ खंड्या खांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरात किरकोळ वादातून खुनाचा प्रयत्न, खून अशा घटना वाढत आहेत. किरकोळ वादातून कात्रज भागात एका तरुणाचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली होती.

Web Title: There has been an incident of beating after an argument between workers at mahindra company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Nigdi
  • Pimpri Crime

संबंधित बातम्या

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
1

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
2

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
4

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.