Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅसचे कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवून तिघांची फसवणूक; मोबाईलवर एपीके फाइल पाठवली अन्…

एमएनजीएल गॅस कनेक्शनचे बिल भरले नसल्याची व ते बंद करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकासह दोन महिलांची फसवणूक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 02, 2026 | 12:30 AM
गॅसचे कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवून तिघांची फसवणूक; मोबाईलवर एपीके फाइल पाठवली अन्...

गॅसचे कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवून तिघांची फसवणूक; मोबाईलवर एपीके फाइल पाठवली अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. अशातच आता एमएनजीएल गॅस कनेक्शनचे बिल भरले नसल्याची व ते बंद करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकासह दोन महिलांची एकूण १९ लाख ५८ हजार ८४० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत, कात्रजमधील ज्येष्ठ नागरिकाची एपीके फाइल पाठवून १३ लाख ६२ हजार ३५१ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शशीकांत रामचंद्र साने (वय ६९, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना ३० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान घडली. सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवून एपीके फाइल पाठवली. ती डाउनलोड करण्यास सांगितले. नंतर बँक खात्याचा अॅक्सेस घेऊन परस्पर पैसे ट्रान्सफर करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याप्रमाणेच, वारजेतील महिलेची ४ लाख ६६ हजार ४८९ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत स्नेहल ज्ञानेश्वर गावडे (वय ३३, रा. अतुलनगर, वारजे) यांनी वारजे पोलिसांत तक्रार दिली आहे.

तिसऱ्या घटनेत महिलेला गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शर्मिला कांतीलाल श्रीमाळ (वय ५५, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी येवलेवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी घडली असून, पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : जबरदस्तीने तरुणाला गाडीत कोंबल, हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेलं अन्…; बारामतीतील संतापजनक प्रकार

Web Title: There has been an incident of cheating three people by threatening to disconnect their gas connections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.