Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरट्यांची हिम्मत वाढली; थेट बड्या नेत्याच्या घरात घुसले अन्…

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे व कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2025 | 02:43 PM
चोरट्यांची हिम्मत वाढली; 'या' बड्या नेत्याच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न

चोरट्यांची हिम्मत वाढली; 'या' बड्या नेत्याच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राजकीय नेत्यांच्या घरांनाही चोरटे टार्गेट करत असल्याचं दिसून येत आहे. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे व कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनंता पांडुरंग गायकवाड (वय ४२ वर्षे रा. वाजेवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे व कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा बंगला असून, सदर ठिकाणी काही कामगार असतात, १५ मे रोजी दुपारच्या सुमारास बंगल्यातील कामगार आले असता त्यांना बंगल्याच्या दरवाजाच्या कड्या तुटलेल्या दिसल्याने त्यांनी पाहणी केली असता, अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या कंपाउंडच्या तारा तोडून पाठीमागील दरवाजा उघडून आतमध्ये येऊन सर्व वस्तू अस्थाव्यस्त टाकून देऊन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.

जबरदस्तीने महिलेची सोनसाखळी हिसकावली

बिबवेवाडी-स्वारगेट रस्त्याने पायी चालणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी जबरदस्तीने सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून, घटनेत महिला थोडक्यात बचावली आहे. चोरट्यांनी हिसका दिल्यानंतर महिला खाली कोसळली. त्यातून ती बचावली आहे. ९९ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून चोरटे पळून गेले. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ५५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: There has been an incident where thieves attempted to rob a senior leaders bungalow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • crime news

संबंधित बातम्या

Bajrang Singh NSG Commando Arrest: NSG कमांडोच चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; 26/11च्या हल्ल्याशी आहे खास कनेक्शन
1

Bajrang Singh NSG Commando Arrest: NSG कमांडोच चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; 26/11च्या हल्ल्याशी आहे खास कनेक्शन

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर
2

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा
3

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…
4

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.