'प्लीज काळी जादू करु नका', चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये... चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
खरंतर चोराने काळ्या जादूच्या भितीने सतर्क होऊन चोरी केलेल्या पैशांतील १९ लाख रुपयांची किंमत कुंटबाला परत करु पाहिली. नरसारावपेट येथील बालाजी आर्केड अपार्टमेंटमध्ये राहणारे आदी नारायण रेड्डी आणि त्यांची पत्नी कोटेश्वरम्मा, एका नातेवाईकाच्या निधनामुळे ३० जुलै रोजी त्यांच्या गावी गेले होते. जेव्हा जोडपे परत घरी परतले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळले. यासोबतच कपाटातून ३१७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २० लाख रुपये चोरीला गेले होते. या घटनेनंतर कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली ज्यानंतर घटनेचा तपास केला गेला. पोलिसांनी अपार्टमेंटचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले ज्यात कोणतीही संशयित घटना कैद झाली नव्हती. तपासात समोर आलं की, सकाळी ३० मिनिटे अपार्टमेंटची वीज बंद झाली होती ज्याचा गैरफायदा घेत चोरांनी घरातून पैसे आणि सोन्याचे दागिने लंपास केले.
काळा जादूला घाबरला चोर
घटनेत वेगळे वळण तेव्हा आले जेव्हा पिडित आदी नारायण रेड्डी यांना घराबाहेर १९ लाख रुपये भरलेली पैशांची बॅग आढळली. या बॅगेत फक्त पैसेच नाही तर त्यासोबत एक पत्र देखील ठेवण्यात आले होते. पत्रात चोराने लिहिले होते की, त्याच्या वाटेचे पैसे तो परत करत आहे, पण सोन्याच्या दागिन्यांविषयी चाैकशी करु नका. यासोबतच पत्रात कुटुंबाला आवाहन करण्यात आले होते की, चोरांना शोधण्यासाठी त्यांनी कोणत्याही काळ्या जादूचा वापर करु नये.
या घटनेनंतर पोलिसांचा संशय आहे की, चोरी कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने किंवा अपार्टमेंटमटशी परिचित असलेल्या व्यक्तीने केली असावी. सध्या पोलिसांनी हस्ताक्षर आणि फिंगरप्रिंट्स यांचा तपास करण्यासाठी घराबाहेर मिळालेल्या पत्राला फॉरेंसिक सायन्स लॅबमध्ये पाठवले आहे. अंदाज लावला जात आहे की, सोन्याचे दागिने हे चोरांनी एकमेकांत वाटले किंवा विकले असण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण परिसरात ही घटना चांगलीच चर्चेत असून पोलिस फाॅरेसिंक रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहेत.