Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

प्रतापनगर परिसरातील एका व्यावसायिकाच्या बंगल्यात घुसलेल्या चार मास्कधारी दरोडेखोरांनी दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2026 | 12:35 PM
राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्...

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्...

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : प्रतापनगर परिसरातील एका व्यावसायिकाच्या बंगल्यात घुसलेल्या चार मास्कधारी दरोडेखोरांनी दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना ६ जुलै रोजी पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी मास्कधारी दरोडेखोरांविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात संजय रामकिशन लाहोटी (बंगला क्रं.४, प्रतापनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी यांचा सिल्कमिल कॉलनी येथे टायर रिमोर्डचा व्यवसाय आहे. तर त्यांच्या पत्नी या समर्थनगरातील एका हॉस्पीटील मध्ये डॉक्टर आहेत. सोमवारी पहाटे सुमारे ३.१५ वाजता दोघेही झोपेत असताना चार दरोडेखोर अचानक त्यांच्या बेडरूममध्ये घुसले. दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडावर हात ठेवत त्यांना जागे केले. चेहऱ्यावर काळे मास्क आणि हातात ग्लोज घातलेल्या आरोपींपैकी एकाच्या हातात टॉर्च व लाठी, तिघांच्या हातात चाकू, तर एकाकडे हातोडा होता. दरोडेखोरांनी प्रथम लाहोटी दाम्पत्याचे तीन मोबाइल ताब्यात घेतले. त्यातील सिमकार्ड काढून मोबाइल घरातच ठेवले. एकाने लाहोटी यांच्या पोटाला चाकू लावत रोख रक्कम व दागिने कुठे आहेत, अशी विचारणा केली. कपाटाच्या चाव्या घेत दरोडेखोरांनी कपाट उघडून तीन लाखांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पिशवीत भरला.

मागील दरवाजा फोडून प्रवेश

दरोडा टाकल्यानंतर आरोपी घराच्या मागील बाजूने पसार झाले. घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांत तक्रार केली तर सोडणार नाही, आम्ही याच परिसरात राहतो, अशी धमकी त्या चौघांनी दिली.

हे सुद्धा वाचा : छतावरून ढकललं तरी वाचला, मग सलाईनमधून टॉयलेट क्लिनर टाकून संपवलं; पत्नीचा थरारक कट उघड

गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; सिया-चेतनचा 4 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; दोघांनीही कुटुंबियांना…

Web Title: Thieves robbed a couple in pratapnagar by threatening them with a knife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • House Theft

संबंधित बातम्या

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
1

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

वनपुरी जमीन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट! बोगस दस्तसाठी महिलांचा वापर; गुन्ह्याच्या नवीन फंडाने पोलिसही चक्रावले
2

वनपुरी जमीन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट! बोगस दस्तसाठी महिलांचा वापर; गुन्ह्याच्या नवीन फंडाने पोलिसही चक्रावले

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
3

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
4

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.