वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शिक्रापूर : उरळगाव (ता.शिरुर) येथील महिलेला व तिच्या मुलाला शेतातील विजेच्या खांबाच्या वादातून धमकी देण्यात आली. या महिलेला बीडचा संतोष देशमुख करण्याची धमकी देत तिचा विनयभंग करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात बाळासाहेब बबन जांभळकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा : Shivani Duble Death : नागपूरच्या तरुणीचा पॅराग्लायडिंग अपघातात मृत्यू, अचानक दोर तुटल्याने 100 फुटांवर थेट जमिनीवर
उरळगाव (ता.शिरुर) येथील महिला तिच्या मुलासह शेतात घेतलेले वीज कनेक्शन जोडण्यासाठी गेलेली असताना न्हावरे गावातील बाळासाहेब जांभळकर तेथे आला. त्याने महिलेच्या मुलाला दगड दाखवून या खांबावरून लाईन घ्यायची नाही, असे म्हणून दमदाटी करु लागला. दरम्यान, महिला त्याला समजावून सांगत असताना बाळासाहेब याने महिलेला अश्लील शिवीगाळ करत हातवारे करुन महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले.
तसेच यावेळी येथील शेती विकून जा, नाहीतर तुमचा बीडचा संतोष देशमुख करेल, अशी धमकी देऊन महिलेच्या शेतातील आंब्याच्या झाडांसह कंपाउंडचे नुकसान केले. याबाबत महिलेने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बाळासाहेब बबन जांभळकर (रा.न्हावरे, ता.शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.
ग्रामपंचायत सदस्याची रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ
ग्रामपंचायतीमधील प्रलंबित कामे आटोपून कार्यालयीन कामकाजासाठी मुख्यालयी जात असलेल्या ग्रामसेवकाला ग्रामपंचायत सदस्याने रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर त्याला जिवे मारण्याची धमकी दिली गेली. ही घटना विरली-खुर्द येथे सोमवारी (दि. 20) दुपारी एकच्या सुमारास घडली.
पुण्यात वाढताहेत गुन्हेगारीच्या घटना
पुण्यातील गुन्हेगारी कमी होत नसताना नव्याने गुन्हेगारीचे केंद्र बनलेल्या बिबवेवाडीत ‘बार वाल्यां’ची गुंडागर्दीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. बिलावरून ३ तरुणांना कामगार व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या तरुणांनी प्रचंड मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, बारच्या कामगारांसोबत बाहेरच्या मुलांना बोलवून मारहाण का केली गेली असा प्रश्न उपस्थित होत आहे. मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, तो पाहून सर्वसामान्याचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही.
हेदेखील वाचा : 200 कुटुंब होणार बेघर…! नालासोपाऱ्यातील 34 बेकायदेशीर इमारतींवर बुलडोझर चालणार! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई होणार