Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला, तिघांकडून लोखंडी गजाने मारहाण; कारणही आलं समोर

पानाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून माजी उपसरपंच रेश्मा कुसेकर यांचे पती नितीन उर्फ अण्णा कुसेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पानटपरी चालकाला लोखंडी गजाने मारहाण केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 27, 2025 | 02:32 PM
शेतीच्या वादातून महिलेवर कोयत्याने वार; लाथाबुक्क्यांसह डोळ्यात मिरचीपूडही भिरकावली

शेतीच्या वादातून महिलेवर कोयत्याने वार; लाथाबुक्क्यांसह डोळ्यात मिरचीपूडही भिरकावली

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून, खून, मारामाऱ्या यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे हप्ता न दिल्याने पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पानाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून माजी उपसरपंच रेश्मा कुसेकर यांचे पती नितीन उर्फ अण्णा कुसेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पानटपरी चालकाला लोखंडी गजाने मारहाण केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किशन शिवाजी नप्ते (वय ४४, रा. नप्तेवस्ती, करंदी) हे आपल्या ‘शिवदरबार पान शॉप’मध्ये काम करत होते. यावेळी नितीन कुसेकर, सचिन कुसेकर, रवींद्र उर्फ पांडा जगताप आणि एक अनोळखी तरुण कारमधून येऊन त्यांनी चार पान घेतली. यानंतर नप्ते याने पैसे मागितल्यावर “गावात आमची दहशत आहे, तु पण दोन हजार रुपये हप्ता दे” अशी धमकी देत, दुकानदाराला ओढून लोखंडी गजाने बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किसन नप्ते यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी नितीन कुसेकर, सचिन कुसेकर, रवींद्र जगताप आणि अनोळखी तरुण यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करीत आहेत.

Web Title: Three men fatally attack a pan tapari driver in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • Arrested News
  • cmomaharashtra
  • crime news
  • crime news marathi
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
1

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
2

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
4

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.