Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मटणाच्या पार्टीत वाद; एकाने मित्राच्या डोक्यात कोयता घातला अन्…

इमारतीच्या टेरेसवर आयोजित केलेल्या मटण पार्टीत मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडली अन् ३ मित्रांनी एका मित्राला बेदम मारहाण केल्याचा प्रकार तळजाईमाता वसाहतीत घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2025 | 03:56 PM
मटणाच्या पार्टीत वाद; एकाने मित्राच्या डोक्यात कोयता घातला अन्...

मटणाच्या पार्टीत वाद; एकाने मित्राच्या डोक्यात कोयता घातला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : इमारतीच्या टेरेसवर आयोजित केलेल्या मटण पार्टीत मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडली अन् ३ मित्रांनी एका मित्राला बेदम मारहाण केल्याचा प्रकार तळजाईमाता वसाहतीत घडला आहे. तीन मित्रांच्या या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. विशेष त्या मित्राच्याच घराच्या टेरेसवर ही मटण पार्टी आयोजित केली होती. याप्रकरणी पोलिसांनी प्रथमेश उर्फ आशिष सुधाकर धडे (वय १९), क्रिश उर्फ केदार सचिन चव्हाण (वय १८) व गणेश सतिश वायदंडे (वय १९) यांना अटक केली आहे. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात २२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण व आरोपी मित्र आहेत. तक्रारदार तरुणाच्या घरावरील टेरेसवर मित्रा-मित्रांनी मटण पार्टीचे आयोजन केले होते. मंगळवारी ही पार्टी आयोजित केली होती. दरम्यान, टेरेसवर मटण पार्टीचा बेत सुरू असताना काही मित्रांमध्ये वादावादी सुरू झाली. तेव्हा भांडण सुरू झाल्याने तक्रारदार तरुणाच्या चुलतीने त्यांना खाली येण्यास सांगितले. ते सर्व खाली आले. नंतर तक्रारदारांने मित्रांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा राग या तीन मित्रांना आला. त्यातील प्रथमेश याने तरुणाला तु का भांडणे सोडवतोस, मी इथला भाई आहे असे म्हणत त्याच्या कानशीलात मारली. नंतर दोघांनी या तरुणाला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. तसेच, प्रथमेशने कोयत्याने त्याच्या डोक्यात वार केला. यामध्ये त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले, असेही सांगण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

किरकोळ वादातून तिघांकडून खूनाचा प्रयत्न

धानोरीत किरकोळ कारणावरून तिघांनी एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक फरार झाला आहे. परशुराम राजू मानीके (वय २१), नागेश मानीके (वय १९, रा. दोघेही. विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत नरेश रामचंद्र तिडंगे (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी व तक्रारदार ओळखीचे असून, एकाच भागात राहतात. बुधवारी रात्री त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्या रागातून धानोरीतील साईधाम सोसायटीज‌वळ तक्रारदारांना गाठून तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

Web Title: Three people brutally beat up one person at a mutton party held on the terrace of a building in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद
1

Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद

‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…
2

‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…
3

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
4

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.