गरिबीमुळे पाकिस्तानची आधीच दयनीय अवस्था (Pakistan Economic Crisi) झाली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे दोन वेळच्या जेवणाचे वांधे झाले आहेत. अशा परिस्थितीत आता पुन्हा पाकिस्तानातुन मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या कराचीमध्ये शुक्रवारी मोठा दहशतवादी हल्ला (Terorrost Attck) झाला आहे. कराची पोलीस मुख्यालयात (KPO) घुसलेल्या सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानी रेंजर्सनी ठार केले आहे. या घटनेत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र एका पोलिसासह दोन जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 11 जण जखमी झाले आहेत.
शाहराह-ए-फैसल भागात शुक्रवारी संध्याकाळी ७.१० मिनिटांनी हा हल्ला झाला. दहशतवादी कराची पोलिस मुख्यालयात (KPO) घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. कराची पोलीस मुख्यालयात घुसलेल्या या दहशतवाद्यांकडे प्रचंड स्फोटके आणि शस्त्रे होती, ज्याच्या सहाय्याने ते सतत हल्ले करत होते. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पाकिस्तानी मीडिया आउटलेट जिओ न्यूजनुसार, रेंजर्स आणि पोलिस कर्मचार्यांसह चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 18 लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात या घटनेचा ‘तीव्र निषेध’ केला जात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी निंदा पुरेशी नसून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी, असं म्हण्टलं आहे. सायंकाळी 7:10 वाजता पोलिस प्रमुखांच्या कार्यालयावर हल्ला सुरू झाला. त्यानंतर पोलीस आणि रेंजर्सनी मिळून 10:46 पर्यंत पाच मजली इमारत अनेक टप्प्यात रिकामी केली.
मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांच्या मृतदेहावर बॉम्बही बांधले होते. पण त्याला बॅाम्बस्फोट करण्याची करण्याची संधी मिळाली नाही. तहरीक-ए-तालिबाननं या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.