Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उंब्रज परिसरात तब्बल 25 लाखांचा लाकूड साठा जप्त; सातारा वनविभागाचे चार ठिकाणी छापे

अवैध वृक्षतोड करून त्याची वाहतूक करणे हा भारतीय वन अधिनियम 1927 च्या कायद्यानुसार गुन्हा असून, सदर गुन्ह्यास एक वर्षापर्यंतचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशा शिक्षेचे प्रावधान आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2026 | 02:46 PM
उंब्रज परिसरात तब्बल 25 लाखांचा लाकूड साठा जप्त; सातारा वनविभागाचे चार ठिकाणी छापे

उंब्रज परिसरात तब्बल 25 लाखांचा लाकूड साठा जप्त; सातारा वनविभागाचे चार ठिकाणी छापे

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा वनविभागाच्या संरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन व विभागीय वन अधिकारी दक्षता कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उंब्रज परिसरातील चार ठिकाणी छापे मारून तब्बल 25 लाख 27 हजार 872 रुपयाचा लाकूडफाटा जप्त करण्यात आला. मौजे उंब्रज, कळंत्रेवाडी, शिवडे आणि कोर्टी या चार ठिकाणी धाड मारून साग आणि रायवळ प्रजातीच्या लाकडाचे १२८३ नग व इतर लाकूडफाटा जप्त करण्यात आला आहे .

सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी दक्षता कोल्हापूर संजय वाघमोडे, वनक्षेत्रपाल संरक्षण अतिक्रमण निर्मूलन गणेश महांगडे, कराडच्या वनपरिक्षेत्राधिकारी ललिता पाटील, वनविभाग सातारा वनपाल आनंद जगताप, सचिन खंडागळे, के के जाधवर, रामेश्वर घुले, अश्विनी नागवे, इत्यादी कर्मचाऱ्यांनी दक्षता पथकाच्या गोपनीय माहितीच्या आधारे उंब्रज परिसरामध्ये चार ठिकाणी छापे मारले.

यामध्ये 98.49 घनमीटर असलेला एकूण 1283 साग व रायवळ प्रजातीचे अनगड नग जप्त केले आहेत. कळंत्रे वाडी व शिवडे येथे ६१.२७५ घनमीटर जळाऊ लाकूड माल जप्त करण्यात आला. या चार कारवायांमध्ये भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 41 नुसार तीन वन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हा लाकूड फाटा कोठून आणण्यात आला, याविषयीची अधिक माहिती दक्षता पथकाकडून घेतली जात आहे.

हेदेखील वाचा : बनावट ॲप्सपासून सुरक्षित रहा! योग्य मार्गदर्शन आवश्यक, काय आहे APK Files

अवैध वृक्षतोड करून त्याची वाहतूक करणे हा भारतीय वन अधिनियम 1927 च्या कायद्यानुसार गुन्हा असून, सदर गुन्ह्यास एक वर्षापर्यंतचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशा शिक्षेचे प्रावधान आहे. नागरिकांनी अशा स्वरूपाची वृक्षतोड अथवा साठा लक्षात आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते वनविभाग सातारा यांनी केले आहे .

हेदेखील वाचा : LPG Gas Booking : एलपीजी सिलिंडर बुक करत आहात का? मग ‘या’ सोप्या पद्धतीने करा झटपट बुकींग

Web Title: Timber stock worth rs 25 lakh seized in umbraj area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Police Action
  • Satara News

संबंधित बातम्या

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श
1

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत
2

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत

Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली
3

Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली

संजय गायकवाडांच्या पुतळ्याचे कुत्र्यांनी तोडले लचके! युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन, २४ तासांत माफीचा इशारा
4

संजय गायकवाडांच्या पुतळ्याचे कुत्र्यांनी तोडले लचके! युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन, २४ तासांत माफीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.