Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yusuf Pathan News: खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक; मेहुण्यालाही ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील भायखळा परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी युसूफ पठाण यांचे सासरे आणि मेहुण्यासह तीन नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 21, 2026 | 04:00 PM
खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक (Photo Credit- X)

खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक
  • मेहुण्यालाही ठोकल्या बेड्या
  • नेमकं प्रकरण काय?
Yusuf Pathan: पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील भायखळा परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी युसूफ पठाण यांचे सासरे आणि मेहुण्यासह तीन नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे.

वादाचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी घडली. स्थानिक रहिवासी युसूफ खान (३०) हे आपल्या कारने घरी जात असताना, रस्त्यावरील साचलेल्या पाणी युसूफ पठाण यांचा मेहुणा शोएब खान याच्या अंगावर उडाले. या शुल्लक कारणावरून वादाची ठिणगी पडली. युसूफ खान यांनी माफी मागण्यासाठी गाडी थांबवली असता, शोएबने त्यांच्याशी शिवीगाळ करत बांबूने कारची काच फोडली आणि त्यांच्यावर हल्ला केला.

The father-in-law of former cricketer and Trinamool Congress (TMC) MP Yusuf Pathan, his son, and another relative were arrested for allegedly attacking a man and his family in Mumbai’s Byculla area two days ago after the man’s car splashed water onto one of them while passing… — ANI (@ANI) April 21, 2026

Pune Crime News : व्यवहार पुर्ण न करता फ्लॅटचा ताबा घेतला; दाम्पत्यावर पुण्यात गुन्हा दाखल

कुटुंबावर सामूहिक हल्ला आणि गंभीर दुखापत

पीडित युसूफ खान आपल्या कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी त्यांना रस्त्यात गाठले. आरोपींनी बांबूच्या काठ्या आणि बेसबॉल बॅटने युसूफ खान आणि त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला चढवला. या अमानुष मारहाणीत पीडित युसूफचा भाऊ सलमान याचा हात मोडला असून, त्याचे काका जकी अहमद हे गंभीर जखमी झाले आहेत.

CCTV फुटेजमुळे आरोपींचे पितळ उघडे

ही संपूर्ण मारहाण परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडिओ पुराव्याच्या आधारे मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान, मेहुणा शोएब खान आणि उमरशाद खान यांना अटक केली आहे. तर चौथ्या आरोपीचा (शहबाज पठाण) शोध पोलीस घेत आहेत.

भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३२४, ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि हल्ल्यात वापरलेली शस्त्रे जप्त केल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Beed Crime: ‘मुलीचं लग्न माझ्याशी लावा’ नाही तर…, गुन्हा दाखल; बीडमध्ये धक्कादायक प्रकार

Web Title: Tmc mp yusuf pathan father in law arrested allegations police action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.