Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नींवर नियंत्रण मिळविण्यासाठी घेतला तांत्रिकांचा आधार , पंजे अन् दात कापले…; मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

मध्यप्रदेश मध्ये असे काही घडले जे ऐकून पोलीस सुद्धा थक्क झाले. आपल्या बायकोवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन नवरोब्यांनी तंत्रिकांचा आधार घेतला. तांत्रिकांच्या सूचनेनुसार जंगलात गेले परंतु ते जंगलातून थेट तुरुंगात गेले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 05, 2025 | 11:31 AM
TANTRIK ( फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)

TANTRIK ( फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

मध्यप्रदेश मध्ये असे काही घडले जे ऐकून पोलीस सुद्धा थक्क झाले. आपल्या बायकोवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन नवरोब्यांनी तंत्रिकांचा आधार घेतला. तांत्रिकांच्या सूचनेनुसार जंगलात गेले परंतु ते जंगलातून थेट तुरुंगात गेले. असं काय केलं त्या दोघांनी? जे ते थेट तुरुंगात पोहोचले. नेमकं काय प्रकरण?

सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला; गुजराती युवकाकडून काळी जादू केल्याचा दावा

प्रत्येक नवऱ्याला आपली बायको आपल्या कंट्रोलमध्ये असावी असं वाटतं. नियंत्रण मिळविण्यासाठी दोन नवऱ्यांनी असं काही केलं जे थेट ते तुरुंगात गेले. मध्यप्रदेशातील सिवनी येथील दोन नवऱ्यांनी आपल्या पत्नींवर नियंत्रण मिळविण्यासाठी तांत्रिकांचा आधार घेतला. ते दोघेही जंगलात गेले आणि तेथून थेट ते तुरुंगात गेले.

का गेले तुरुंगात?

तांत्रिकाच्या सूचनेनुसार त्यांनी वाघिणीची पंजे आणि दात कापले, तसेच तिचे चामडे काढण्याचा प्रयत्न केला. पण, हे कृत्य उघडकीस आले. दोघांना पोलिसांनी अटक केली आणि तुरुंगवास झाला. या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि विचित्र आहे.

नैसर्गिक मृत्यू नसल्याने पकडलं

सिवनी जिल्ह्यात पेंच टायगर रिझर्व्ह एरियात 26 एप्रिल 2025 रोजी एक वाघिणीचा मृतदेह सापडला. तपासानंतर या वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला नसून तिचे पंजे कापल्याने झाल्याचं आढळून आलं. वाघिणीचे टोकदार दात काढलेले होते आणि तिची चमडीही काढण्यात आलेली होती. त्यानंतर वनविभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आरोपींना अटक केली. या आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे.

पाच अटकेत

या प्रकरणात एकाला अटक केल्यानंतर त्यात आणखी पाचजण असल्याचं उघड झालं. राज कुमार, झाम सिंह, छबी लाल, रत्नेश पार्टे आणि मनीष उइके असं या पाच लोकांची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर अधिक चौकशी केली असता राज आणि झाम या दोन आरोपींनी जी कहाणी सांगितली ती ऐकून पोलीस आणि वन विभागाचे अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

आरोपींनी काय सांगितलं ?

दोन्ही आरोपींनी बायकोला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हे कृत्य केल्याचं सांगितलं. त्यांना एका तांत्रिकाने वाघाचे पंजे आणि दात आणण्यास सांगितलं होतं. त्यावर तंत्रमंत्र केल्याने ताकद मिळते. त्यामुळे बायको वशमद्ये येऊ शकते. जेव्हा ते वाघिणीचे दात आणि पंजे घेऊन आले तेव्हा तांत्रिकाने वाघिणीचे चामडे (खाल) मागितली. त्यासाठी पुन्हा हे दोघे जंगलात गेले. त्यावेळी त्यांना कुणी तरी पाहिलं आणि पकडल्या गेले. या गुन्ह्यात आणखी तीन लोकांचं समावेश असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या पाचही जणांना अटक केलं असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Nagpur News : नागपुरात भीषण अपघात; ओव्हरटेक करणं तिघांच्या जिवावर बेतलं; मालवाहू वाहनाची ट्रकला जोरदार धडक

Web Title: Took help of tantrics to control wives cut claws and teeth shocking incident in madhya pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • crime news
  • madhya pradesh
  • Madhya Pradesh crime

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
3

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
4

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.