SEEMA HAIDAR (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)
देशात पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर सरकारने अनेक निर्णय घेतले त्यात भारतात असलेल्या पाकिस्तानी लोकांना पाकिस्तानात जाण्यास सांगितले. पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि उत्तर प्रदेशातील तरुणाचा प्रेम प्रकरण तुम्हाला लक्षात असेलच. सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. सीमा हैदरवर गुजरातमधून आलेल्या एका युवकाने हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे. तेजस ज्ञानी असं या युवकच नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा हैदरने आपल्यावर काळी जादू केल्याचा दावा या आरोपीने केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कोर्टाने आरोपीला सुनावली ‘ही’ शिक्षा
उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील रबूपुरा गावात सीमा हैदर राहते. आरोपी तेजस झानी नावाच्या युवकाने सीमा हैदर हिच्या घराच्या दरवाज्यावर लाथा मारत प्रवेश केला आणि आत गेल्यानंतर तिला काही समजण्या आधीच त्याने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर सीमाने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि आरोपी युवकाला पकडून मारहाण केली. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
सीमा हैदर हिच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याचा मोबाईल जप्त केला असून त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीचे मानसिक स्वास्थ्य स्थिर नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली .या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
कोण आहे सीमा हैदर?
सीमा हैदर ही मूळची पाकिस्तानची नागरिक असून 2023 मध्ये ती नेपाळमार्गे भारतात दाखल झाली होती. तिचा दावा आहे की, पबजी खेळताना तिची ओळख नोएडामधील सचिन याच्याशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. नंतर दोघांनी नेपाळमध्ये लग्न केल्याचे ती सांगते.
सीमा हैदरचे वकील ए. पी. सिंह यांनी यापूर्वी सांगितले होते की, तीने हिंदू धर्म स्वीकारला असून आता ती एक सनातनी महिला आहे. भारत सरकारने अलीकडे पाकिस्तानातून आलेल्या काही नागरिकांचे व्हिसा रद्द केल्यानंतर सीमाला पाकिस्तानमध्ये परत पाठवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वकिलांच्या मते, तिचे प्रकरण एटीएसकडे प्रलंबित असून सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. दरम्यान, आपण भारताची सून असून आपल्याला भारतातच राहू द्या अशी मागणी सीमा हैदरने केली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ही मागणी केली आहे.
CBI अधिकारी असल्याचं भासवून पुण्यातील तरुणाची 42 लाखांची सायबर फसवणूक; स्काईप ॲपवरून कॉल