Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्…

काही काळापूर्वी रूपा यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलच्या बॅगेत पैसे आणि मोबाईल फोन आढळल्याने त्यांना फटकारले होते. तसेच त्यांच्या पालकांनाही याबाबत माहिती दिली होती. याच कारणामुळे दोन्ही विद्यार्थी प्राचार्यांवर नाराज असल्याचा पोलिसांना संशय आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 21, 2026 | 09:37 AM
खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्...

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्...

Follow Us
Follow Us:

हैदराबाद : तेलंगणातील एका शाळेच्या मुख्याध्यापिका कल्लू रूपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणात दहावीतील 2 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रूपा रेड्डी या कोंडा मल्लेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका होत्या. १२ ऑगस्टला सकाळी त्या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या शरीरावर चाकूने २७ वार करण्यात आले होते.

पोलिसांच्या तपासात त्यांच्या शेवटच्या फोन कॉलमध्ये उच्चारलेल्या ‘बाबू’ या शब्दाने महत्त्वाचा धागा मिळाला. रूपा शाळेतील काही विद्यार्थ्यांना प्रेमाने ‘बाबू’ म्हणत असत. या आधारावर तपास पुढे नेत पोलिसांचा संशय दहावीतील दोन विद्यार्थ्यांवर गेला. चौकशीत दोघांनीही हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, काही काळापूर्वी रूपा यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलच्या बॅगेत पैसे आणि मोबाईल फोन आढळल्याने त्यांना फटकारले होते. तसेच त्यांच्या पालकांनाही याबाबत माहिती दिली होती. याच कारणामुळे दोन्ही विद्यार्थी प्राचार्यांवर नाराज असल्याचा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, घटनेच्या दिवशी रूपा यांचे पती हैदराबादमध्ये होते. त्यांनी रूपा यांना फोन केला; मात्र फोनला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला.

हत्येनंतर गोव्यात केली पार्टी

हत्येनंतर दोन्ही विद्यार्थ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेले कपडे आणि मंकी कॅप त्यांनी जमिनीत पुरल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोघे गोव्यालाही गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून १.५४ लाख रुपये रोख, एक आयफोन, रूपा रेड्डी यांचा मोबाईल आणि हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. तपासात असेही समोर आले की, हत्येपूर्वी दोघांनी ऑनलाईन झटपट पैसे कमावण्याचे मार्ग शोधले होते.

5 दिवस घराची रेकी

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थ्यांनी हत्येच्या सुमारे ५ दिवस आधी चोरीचा कट रचला होता. त्यांनी रूपा रेड्डी यांच्या घराची रेकी केली होती. ओळख लपवण्यासाठी चाकू, हातमोजे आणि मंकी कॅपही खरेदी केली. घटनेच्या दिवशी त्यापैकी एक विद्यार्थी मंकी कॅप आणि हातमोजे घालून घरात शिरला. बेडरूममध्ये सुमारे २.५० लाख रुपये दिसल्यानंतर तो पैसे घेऊन पळण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी त्याची मंकी कॅप डोक्यावरून घसरली आणि रूपा यांनी त्याला ओळखले.

धक्कादायक ! बँक मॅनेजर पत्नीची गोळ्या झाडून हत्या; नंतर बहिणीचाही खून मग स्वत: पतीची आत्महत्या

Web Title: Two students committed murder because the headmistress scolded them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Telangana

संबंधित बातम्या

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त
1

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
4

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.