क्रूरतेच्या सर्व सीमा पार! दोन मुलांना लैंगिक कृत्य करण्यास बळजबरी करत अत्याचार, व्हिडिओही बनवला; कारण वाचून हादराल (फोटो सौजन्य-X)
Parbhani Crime News in Marathi : महाराष्ट्रातून एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलांना कर्ज फेडता न आल्याने अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यांना गाडीतच एकमेकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर आरोपींनी या लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओही बनवला. पीडित मुले परभणी येथील रहिवासी आहेत. या घटनेनंतर पीडित मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक उपचार सुरू आहेत. अल्पवयीन मुलाच्या आईच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अनैसर्गिक लैंगिक संबंध, अपहरण, हल्ला आणि चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे असे आरोप आहेत. पोलिसांनी पॉक्सो कायदा देखील लागू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीकडून काही पैसे उधार घेतले होते. मुले पैसे परत करू न शकल्याने कर्ज देणाऱ्या व्यक्तीने त्यांना गाडीत ओलीस ठेवले. त्यांना चालत्या गाडीत प्रथम नग्न करण्यात आले, त्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुलांना एकमेकांसोबक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींना या घटनेचा व्हिडिओही बनवला.
या अपमानास्पद घटनेचे बळी ठरलेल्या दोन्ही मुलांपैकी एक १९ वर्षांचा आहे. एक अल्पवयीन आहे. या प्रकरणात पोलिसांनी गौतम दिलीप गोस्वामी उर्फ ऋतिक (२५) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. गौतमवर मुलांना पैसे उधार दिल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, इतर आरोपींची ओळख पंजूभाई गोस्वामी आणि इतर दोघांची ओळख देराज आणि भरत अशी झाली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
अल्पवयीन मुलाच्या आईने एलटी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आईने सांगितले आहे की गौतम गोस्वामीने गेल्या शुक्रवारी तिच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला आमिष दाखवले होते. घाणेरड्या कृत्यानंतर, आरोपींनी धमकी दिली की जर त्यांनी कर्ज घेतलेले पैसे परत केले नाहीत तर व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केला जाईल. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार आरोपी मुलांना पुण्यातही घेऊन गेले. तेथे त्यांना एका खोलीत ओलीस ठेवण्यात आले. यादरम्यान त्यांना मारहाणही करण्यात आली. पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच मुलांना सोडण्यात आले.