Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाफे येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक पेटवला

ट्रक आणि दुचाकी यांच्यातील जोरदार धडकेत खंडाळा येथील तरुण किरण पागदे, खंडाळा, वाटद या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याचे समोर आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 01, 2025 | 03:35 PM
चाफे येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक पेटवला

चाफे येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक पेटवला

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी: निवळी-जयगड मार्गावरील चाफे येथे मंगळवारी 11.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात खंडाळा येथील तरुण किरण पागदे (खंडाळा, वाटद) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात चाफे गावाजवळील निवळी-जयगड मार्गावर घडला. ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकलस्वाराला तब्बल चारशे फुट फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हा खंडाळा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु ट्रकच्या बेदरकार चालकामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

डोंबिवलीतील गार्डनमध्ये होणाऱ्या वाचनालयावरून शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली

अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ट्रक जळत असताना धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिस्थिती आणखीनच गंभीर बनवली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांचा रोष कायम असल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, जळालेल्या ट्रकमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, परंतु पोलिसांनी परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली.

या अपघातामुळे चाफे आणि खंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या अकाली निधनाने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीसह अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील ‘या’ महत्वाच्या मेट्रो मार्गिकेचा मुहूर्त चुकणार; डिसेंबरपर्यंत सहन करावा लागणार वाहतूक कोंडीचा सामना

Web Title: Two wheeler rider killed truck set on fire by angry mob in chafe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • maharashtra
  • Road Accident

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.