
Ulhasnagar Politics : मुख्यमंत्र्यांच्या उल्हासनगर दौऱ्यात भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर! महापौरांना निमंत्रणच नाही; मेट्रोबाबतह
Ulhasnagar Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या हस्ते उल्हासनगरमधील सीएचएम महाविद्यालयातील शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन पार पडले. हा कार्यक्रम खाजगी असला तरी उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याचं समोर आलं आहे.
कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक आमदार कुमार आयलानी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या दरम्यान उल्हासनगरमधील सत्ताधारी शिवसेना अनुपस्थित राहिल्याने मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना आणि भाजपातील अंतर्गत कलह समोर आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कार्यक्रम एका शैक्षणिक इमारतीच्या उद्घाटनाचा असला तरी यासाठी भाजपाचे पदाधिकारी पक्षाचे गमजे घालून उपस्थित राहिले. तर यावेळी शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न देखील झाला. मात्र शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी उल्हासनगरमध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरू होणओार असल्याबाबत वक्तव्य केले आहे. यासोबतच शहरातील काँक्रीट रस्ते, उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र योजना लवकरच सुरू होणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल आणि पाणीपुरवठा अशा विविध विकासकामांमुळे उल्हासनगरच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उल्हासनगरचा चेहरामोहरा बदलणार आता सर्वांचे लक्ष विकासकामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे! लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उल्हासनगर मध्ये एका कॉलेजच्या इमारतीच्या उद्घाटन निमित्त आले होते. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत आमदार कुमार आयलानी, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया भाजपा पदाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान एक संतापजनक प्रकारही समोर आला आहे. मुख्यमंत्री स्टेजवर सावलीत बसले होते, तर दुसरीकडे विद्यार्थी मात्र दुपारच्या कडक उन्हात बसून मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकत असल्याचे पाहण्यास मिळाले.
उन्हाचा तडाखा इतका तीव्र होता की, काही विद्यार्थ्यांना डोक्यावर रुमाल ठेवून उन्हापासून बचाव करावा लागला. मुख्यमंत्र्यांसाठी सावलीची व्यवस्था, मात्र विद्यार्थ्यांसाठी कडक उन्हाची शिक्षा! हा नेमका कोणता समानतेचा संदेश? असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला.
Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएचएम महाविद्यालयातील नवीन शैक्षणिक इमारतीच्या उद्घाटनासाठी उल्हासनगरमध्ये आले होते.
Ans: या कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभा गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया आणि भाजप पदाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.
Ans: सीएचएम महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण महापौर अश्विनी निकम यांना मिळाले नसल्याचे समोर आल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.