Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime News: गांजा विक्रीवर पोलिसांचा आणखी एक घाव; ४२५ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ मध्यवर्ती पोलिसांनी धडक कारवाई करत किरण सुभाष वाघमारे याला ४२५ ग्रॅम गांजासह अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात आरोपी रंगेहात सापडला. विशेष म्हणजे, याच परिसरातून दहा दिवसांपूर्वीही एका अमली पदार्थ विक्रेत्याला अटक करण्यात आली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 29, 2026 | 06:01 PM
गांजा विक्रीवर पोलिसांचा आणखी एक घाव; ४२५ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत

गांजा विक्रीवर पोलिसांचा आणखी एक घाव; ४२५ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत

Follow Us
Follow Us:
  • उल्हासनगरात घरात गांजा विकताना रंगेहात आरोपीला पोलिसांनी अटक केली
  • मध्यवर्ती पोलिसांची धडाकेबाज कारवाई
  • 10 दिवसांत दुसऱ्यांदा गांजा तस्कर अटकेत
Ulhasnagar Crime News: उल्हासनगर शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीविरोधात मध्यवर्ती पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत ४२५ ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील शास्त्रीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, किरण सुभाष वाघमारे हा गांजा विक्रीसाठी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मध्यवर्ती पोलिसांनी सापळा रचला. आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातून सुमारे ४२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

kolhapur Crime: पंढरपूर दर्शनाच्या बहाण्याने गोठ्यात नेलं, माजी सरपंचेची गळा आवळून हत्या; मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट, मात्र..

विशेष म्हणजे, याच शास्त्रीनगर परिसरातून अवघ्या दहा दिवसांपूर्वीही एका अमली पदार्थ विक्रेत्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे या भागात अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे जाळे सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. मध्यवर्ती पोलिसांनी शहरात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी गुप्त माहितीच्या आधारे सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि पुरवठादारांचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, शहरातील तरुणांमध्ये वाढत्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

याआधीही उल्हासनगर शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात विठ्ठलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 किलो 329 ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून गांजासह मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, या प्रकरणात आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प-4 येथील आदर्शनगर परिसरात एक संशयित व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.

Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर देऊन आनंदात निघाली; दुचाकी घसरली अन् होत्याचं नव्हतं झालं, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा

Web Title: Ulhasnagar police arrest ganja peddler near vitthalwadi railway station 425 grams seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • crime
  • drug
  • police

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.