कसा झाला अपघात?
२५ जुलै रोजी नर्सिंगचा शेवटचा पेपर असल्याने दोन्ही मैत्रिणींमध्ये मोठा उत्साह होता. पेपर सुरळीत पार पडल्यानंतर दोघीही आनंदाने दुचाकीवरून आपल्या घराच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र, महाळुंगे येथील रस्त्यावरून जात असताना अचानक तिचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी वेगात घसरली. तीव्र वेगामुळे ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्यात जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की सेजालच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. उपस्थित स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणींना नाल्यातून बाहेर काढले आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
एकीची प्रकृती चिंताजनक
वैष्णवी अहिरे ही देखील या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली. तिच्यावर तातडीने वैधकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे भागवत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळी लवकर उठवल्याचा राग… सुनेने सासूला लाकडी फळीने केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल
रत्नागिरी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे आहे. सुनेनेच सासूला मारहाण केल्याचे समोर आले आहे. सासूने सुनेला शेतातील काम करण्यासाठी सकाळी लवकर उठवले. याचाच राग मनात धरून सुनेने सासूला अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर शिवीगाळ देखील केली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत सुनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. या मारहाणीत सासू गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने रुगालयात दाखल केले. घडलेली घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात रेहेळ-गावणवाडी येथे घडली.
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार; जीवे मारण्याची धमकी दिली अन्…
Ans: सेजल भागवत.
Ans: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-दापोली मार्गावरील महाळुंगे परिसरात.
Ans: नर्सिंगचा शेवटचा पेपर देऊन घरी परतत होत्या.






