Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime : ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट, बुरखा घालत फुल-प्रुफ प्लॅनिंगने केला मित्राचा खून

Murder Case : १५ दिवसांच्या प्लॅनिंगने संपवली १५ वर्षांची मैत्री. दागिन्यांच्या हव्यासापोटी मित्रानेच मित्राचा खून केला आणि नंतर याला नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सोन्याच्या दागिन्यांना जप्त करण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2026 | 12:04 PM
UP Crime : ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट, बुरखा घालत फुल-प्रुफ प्लॅनिंगने केला मित्राचा खून

UP Crime : ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट, बुरखा घालत फुल-प्रुफ प्लॅनिंगने केला मित्राचा खून

Follow Us
Follow Us:
  • अनेक वर्षांच्या जवळच्या नात्याचा शेवट धक्कादायक वळणावर जाऊन पोहोचला.
  • आरोपीने गुन्ह्यासाठी आधीपासून सविस्तर तयारी केल्याचा दावा तपासात समोर आला.
  • पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे उघड झाले.
मैत्रीच्या नात्याला कलंक ठरणारी घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून समोर आली आहे. मित्राचे काही दागिने मिळवण्याच्या लालसेपोटी १५ वर्षांची मैत्री विसरला आणि मित्रानेच मित्राचा खून केला. मुख्य म्हणजे, या हत्येसाठी त्याने क्राईम पेट्रोल मालिकेचा आधार घेतला. टिव्ही शो पाहून तो १५ दिवस मित्राच्या हत्येचा कट रचत होता. इतकंच नाही तर ओळख लपवण्यासाठी त्याने बुरख्याचीही मदत घेतली. परंतु या प्रकरणात पोलिसांनी काैतुकास्पद कारवाई केली आणि काही दिवसांतच आरोपीला पकडून ताब्यात घेण्यात आले.

क्रुरतेची पराकाष्ठा! सनकी आशिकने अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने केली हत्या, गळ्यात दोरी बांधत छतावर लटकवले शरीर

सोन्याची चेन आणि ब्रेसलेटसाठी केला खून

मृताची ओळख विजय प्रकाश गुप्ता अशी पटली असून ते नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोचिंग ऑपरेटर म्हणून काम करत होते. १५ वर्षांपासून त्यांची आरोपी वकील मोहित द्विवेदीसोबत मैत्रीचे नाते होते. पण काही दागिन्यांच्या लालसेपोटी आरोपीने मैत्री विसरली आणि मित्रालाच मृत्यूच्या दारी पोहचवले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मोहितने सोन्याची चेन आणि ब्रेसलेटच्या लालसेपोटी मित्राचा खून केला. आरोपीने अचानक केलेला हा खून नव्हता तर तब्बल १५ दिवस यूट्यूबवर काईम पेट्रोल पाहिल्यानंतर संपूर्ण प्लॅनिंग करुन त्याने हत्येचा हा कट रचला. मालिका पाहून त्याने ओळख कशी लपवायची आणि पुरावे कसे नष्ट करायचे याची माहिती घेतली.

अशी केली हत्या

हत्येपूर्वी आरोपीने बुरखा घालत आपली ओळख लपवली आणि नवाबगंजमध्ये मित्राचा खून केला. यानंतर हा गुन्हा हार्ट अटॅकने झाला आहे असा भासवण्याचा त्याने प्रयत्न केला. मृत व्यक्तीला आधीपासून बीपी आणि डायबीटीजचा त्रास होता अशात त्याने शरीरावर गंभीर इजा होऊ नये याची काळजी घेतली. यावेळी मित्राच्या खिशात असलेल्या १५ हजार रुपयांनाही त्याने हात लावले नाही जेणेकरुन याला दरोडेखोरीचे वळण मिळू नये.

Pune Gas Explosion: खराडीत सिलेंडर स्फोटाची भीषण दुर्घटना; सिलेंडर बदलताना आग भडकली आणि एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

सीसीटिव्हीतून खरं सत्य झालं उघड

सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत होता. पण पोलिसांनी संशायाच्या आधारावर जेव्हा १००० सीसीटिव्ही कॅमेरांमधील फुटेज तपासले तेव्हा खरं सत्य उघड झालं. तपासात बुरखा घातलेली संशयास्पद महिला दिसून आली जिच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांनी जेव्हा आरोपीचा फोन नंबर ट्रॅक केला तेव्हा गुन्ह्यावेळी त्याचे लोकेशन बुरखा घातलेल्या महिलेजवळ दिसले ज्यावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाैकशी सुरु केली. चाैकशीत आरोपी फार काळ आपला गुन्हा लपवू शकला नाही आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याजवळ असणाऱ्या सोन्याच्या साखळीला आणि ब्रेस्टलेटला जप्त करण्यात आले आहे. हत्येच्या या प्रकरणाने फक्त गुन्ह्यातील गूढता शोधून काढली नाही तर आजच्या काळात लालसेपोटी लोक कोणकोणत्या थराला जाऊ शकता याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले.

Web Title: Up crime kanpur man murders friend for gold chain and bracelet after watching crime patrol accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • crime news
  • Kanpur
  • Murder Case

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.