Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चपाती उशीरा मिळाली म्हणून नवरदेव भडकला, भर लग्न मंडपात केलं असं काही की…

एका गावात वरातीला जेवण उशीरानं दिल्यानं नवरदेव भडकला. नवरदेव इतका भडकला की, त्यानं लग्न करण्यासच नकार दिला. एका लग्नात नवरदेवाकडील पाहुण्यांना जेवण देण्यास थोडा उशीर झाला. त्यामुळे नवरदेव आणि त्याचे नातेवाईक नाराज झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 28, 2024 | 06:08 PM
चपाती उशीरा मिळाली म्हणून नवरदेव भडकला, भर लग्न मंडपात केलं असं काही की… (फोटो सौजन्य-X)

चपाती उशीरा मिळाली म्हणून नवरदेव भडकला, भर लग्न मंडपात केलं असं काही की… (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

लग्न म्हटलं की, दोन व्यक्ती, दोन कुटुंब एकत्र येतात.पण उत्तर प्रदेशात अशी एक घटना घडली की सर्वांना वाचून धक्काच बसेल. उत्तर प्रदेशातील चंदौली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नातील पाहुण्यांना उशीरा चपाती मिळाली म्हणून रागाच्या भरात नवरदेवाने लग्न मोडले. नवरदेव एवढ्यावरच थांबला नाही, त्याच रात्री त्याने दुसऱ्या तरुणींसोबत लग्नही केले. ही बाब नववधूला समजताच ती चक्रावून जाते.

दोन्ही बाजूंमध्ये तडजोड

अशा स्थितीत वधूने बुधवारी एसपी आदित्य लंघे यांना अर्ज देऊन या प्रकरणाची तक्रार केली आहे. रडत नवरीने न्यायासाठी याचना केली. अशा स्थितीत पोलिस कारवाईत आले आणि त्यानंतर शुक्रवारी पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांमध्ये समजूत काढण्यात आली.

हे प्रकरण जिल्ह्यातील मुगलसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंडस्ट्रियल टाऊन चौकी परिसरातील हमीदपूरचे आहे. या घटनेबाबत बोलताना पीडित वधूने सांगितले की, सात महिन्यांपूर्वी त्याच गावातील महताब नावाच्या व्यक्तीसोबत तिचे लग्न ठरले होते. 22 डिसेंबरला हे लग्न होणार होते. कुटुंबीयांनी लग्नाची सर्व तयारी केली होती. ठरल्याप्रमाणे मिरवणूक आली. सर्वांचे स्वागत करण्यात आले. मात्र, मेजवानीच्या वेळी एका पाहुण्याने चपाती उशिरा मिळत असल्याचे सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे ऐकून इतर लोकही संतापले.

कराडमधील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; तब्बल ‘इतक्या’ महिलांची केली सुटका

पीडितेच्या म्हणण्यानुसार, घरातील सदस्य सर्वांना समजावून सांगत होते पण ते मान्य होत नव्हते. यामुळे वरालाही राग आला आणि तेथून निघून गेला.नवरदेव गेल्यानंतर लग्नाची मिरवणूकही तिथून निघाली. वधूचा आरोप आहे की त्याच रात्री वराचे लग्न गावातील एका नातेवाईकाच्या मुलीशी झाले.

लग्नात ७ लाख रूपयांचं नुकसान

त्याचवेळी वधू पक्षात बसलेली पीडिता वाट पाहत राहिली. या घटनेनंतर वधूचे कुटुंब संतप्त आणि दु:खी आहे. त्यांनी एसपी कार्यालय गाठून न्यायाची याचना केली. लग्नाच्या वरातीत दोनशे लोक आले होते, असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यांच्या पोटापाण्यासाठी खूप पैसा खर्च झाला आहे. याशिवाय दीड लाख रुपये हुंडाही दिला होता. एकूण ६ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, तक्रार आल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोड झाली आहे.

प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून देताय? मग सावधान; पोलीस ॲक्शन मोडमध्ये, मालकांवर थेट…

Web Title: Uttar pradesh chandauli groom left wedding due to delay in serving rotis to the baraatis then get married with another girl same night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 06:08 PM

Topics:  

  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक
1

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक

घोर कलियुग! ‘मला न्याय द्या तोपर्यंत…’ न्यायासाठी पतीचे उपोषण; घटस्फोटाशिवाय प्रियकरासह दागिने घेऊन पत्नी फरार, मुलंही झाली
2

घोर कलियुग! ‘मला न्याय द्या तोपर्यंत…’ न्यायासाठी पतीचे उपोषण; घटस्फोटाशिवाय प्रियकरासह दागिने घेऊन पत्नी फरार, मुलंही झाली

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी
3

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी

ऑपरेशन पजामा! पत्नीच्या कपड्यांसाठी लावला 112 वर फोन; नवऱ्याच्या मागणीने पोलिसांचेही हसू आवरेना; Video Viral
4

ऑपरेशन पजामा! पत्नीच्या कपड्यांसाठी लावला 112 वर फोन; नवऱ्याच्या मागणीने पोलिसांचेही हसू आवरेना; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.